शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
6
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
7
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
8
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
9
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
10
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
11
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
12
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
13
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
14
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
15
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान
16
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
17
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
18
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
19
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
20
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक

ओझरला गजानन महाराज प्रकटदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 15:16 IST

ओझरटाऊनशिप : येथील उत्सव समितीच्यावतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पालखीची शोभायात्राही काढण्यात आली.

ओझरटाऊनशिप : येथील उत्सव समितीच्यावतीने श्री गजानन महाराज प्रकट दिन उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. तसेच पालखीची शोभायात्राही काढण्यात आली. गण गण गणात बोते व श्री गजानन महाराजकी जय च्या जयघोषात गणपती मंदिर काँम्प्लेक्स मधील मंदिरात झालेल्या प्रकट दिन उत्सवात सकाळी श्री चे गजानन विजय ग्रंथाचे पारायण झाले. सांयकाळी साडेचार वाजता पादुकांच्या पालखीची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी हत्ती, उंट, घोडे, त्यांच्या मागे एच.ए.एल. कामगारांच्या एच.ए.ई. डब्लू आर.सी संस्थेचे पुरूष व महिलांचे आंतरनाद ढोल पथक, पुरूष व महिलांचे भजनी मंडळे, महिलांचे पथक, श्रीच्या पादुका असलेली पालखी व श्रीची प्रतिमा ठेवलेल्या विद्युत रोषणाई केलेल्या चित्ररथाचा समावेश होता. शोभा यात्रा टाऊनशिप मधील मुख्य मार्गावरून नेण्यात आली. शोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी सडामार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. मंदिर परिसरात केलेल्या विद्युत रोषणाईने परिसर झगमगुन गेला होता. शोभायात्रेत विदर्भ मित्रमंडळाचे आजी माजी पदाधिकारी, उत्सव समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते. श्रीच्या पालखी दर्शनासाठी भाविकासह नागरिकांनी शोभायात्रा मार्गावर दुतर्फा गर्दी केली होती. पहाटे अभिषेक करण्यात आला. त्यानंतर श्रीची पूजा करण्यात आली. ११ वाजता एच.ए.एल.चे सी.ओ. शेषगिरी राव , महाव्यवस्थापक ए.बी घरड, हुलीराज, यु.बी.सिंग व शैलेन्द्र खपली , कामगार संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही. शेळके, सरचिटणीस सचिन ढोमसे यांचेसह मान्यवर अधिकारी यांचे हस्ते महाआरती करण्यात आली. पुजारी पंकज पुराणिक व विशाल जोशी यांनी पौरोहित्य केले.