शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

गडकरी यांची घोषणा : कोट्यवधींच्या रस्ते कामांचे भूमिपूजन

By admin | Updated: November 6, 2016 01:10 IST

द्वारका ते नाशिकरोड उड्डाणपुलास मंजुरी

नाशिक : राज्य सरकारकडे पैसे नाहीत आणि महापालिकेला नवीन रस्त्यांचा बोझा परवडणारा नसल्यामुळे नाशिक ते नाशिकरोड दरम्यान होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी द्वारका ते नाशिकरोड रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गावर थेट उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी केली. नाशिक शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण, नवीन उड्डाणपुलाची निर्मिती व विविध रस्त्यांच्या बळकटीकरणाच्या कामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. येथील के. के. वाघ महाविद्यालयाच्या प्रांगणात या कामांच्या कोनशिलेचे अनावरण नितीन गडकरी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले. ते पुढे म्हणाले, देशातील रस्ते अपघाताला रोड इंजिनिअरिंग जबाबदार असून, त्यातून दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत ते टाळण्यासाठी देशात अपघात होणारी ठिकाणे शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर देशात ९६ हजार किलोमीटर लांबीचे रस्ते रूंदीकरण करण्याचे ठरले होते, आता तेच दोन लाख किलोमीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहेत. देशात बारा एक्स्प्रेस हायवे करण्यात येणार असल्याने त्याचा फायदा दिल्लीसह अन्य राज्यांना होऊन प्रदूषणमुक्ती व वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. देशात रस्ते उभारणीसाठी पैशांची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून गडकरी यांनी आपल्या खात्याचे बजेट ५५ हजार कोटीचे असले तरी, मला २५ लाख कोटी रुपयांचे काम करायचे आहे. देशात लवकरच बारा ठिकाणी वॉटर पोर्ट तयार करण्यात येत असून, त्यामुळे पाण्यावरून उड्डाण केलेले विमान कोणत्याही विमानतळावर उतरू शकेल. पाण्यावर व रस्त्यावरही चालणारी मोटार आपण अमेरिकेतून विकत घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. विकास करण्यासाठी पैशांची नव्हे तर इच्छाशक्तीची गरज असल्याचे सांगून, नाशिक हे प्रगतिशील शहर असून, येथील शेतकरीही प्रगतिशील आहे, त्यामुळे या शहराच्या गरजा पूर्ण करण्यास आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीही गडकरी यांनी दिली. यावेळी आमदार बाळासाहेब सानप, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, हेमंत गोडसे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य महाव्यवस्थापक अतुलकुमार यांनी केले.