शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी चित्रपटगृहात सोशल डिस्टनसचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:14 IST

कोरोना नियमांना केराची टोपली दाखवित सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या ...

कोरोना नियमांना केराची टोपली दाखवित सिनेमाप्रेमी मालेगावकरांनी चित्रपटगृहाच्या तिकीट खिडकीवर गर्दी केली. ना मास्क, ना सुरक्षित अंतर अशा या हुल्लडबाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे . या प्रकाराची कॅम्प विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी गंभीर दखल घेतली आहे छावणी पोलिसांना याबाबतच्या चौकशीचे आदेश दिले असून संबंधित चित्रपटगृह व्यवस्थापकवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती. गुन्हेविश्‍वावरील ‘मुंबई सागा’ चित्रपटाच्या शुक्रवारी सायंकाळच्या ‘शो’ वगळता अनेक सिनेरसिकांनी मास्क परिधान केले नव्हते. तिकीट काढण्यापासून चित्रपटगृहात प्रवेश करण्यासाठी गर्दी झाली. या प्रकाराची स्थानिक व जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली.

चित्रपट गृहे बंद ठेवण्याचा प्रस्ताव

मालेगावी सध्या ८७८ , तर तालुक्यात २१८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत १८४ जणांचा मृत्यू झाला आहे. सिनेमागृह, मॉल, हॉटेल्स, रेस्टॉरंट याठिकाणी क्षमतेच्या ५० टक्केच व्यक्तींना प्रवेश देण्याचे निर्देश आहेत. शिवाय मास्कविना प्रवेश नाकारणे, प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रीनिंगही बंधनकारक केली आहे. या आदेशाला शुक्रवारी वाटाण्याचा अक्षता लावण्यात आल्या. शुक्रवारी सुरू असणारे चित्रपट गृहे बंद ठेवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर केला जाणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहात हुल्लडबाजी करणाऱ्याना चाप बसण्याची शक्यता आहे.

फोटो : २० मालेगाव