शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांच्या परिस्थिवीवर पुढील निर्णय अवलंबून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:14 IST

नाशिक: करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दीवर नियंत्रण आणणारे आहेत. या आदेशाची ...

नाशिक: करोनाची वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काढलेले निर्बंधाचे आदेश व्यवसाय व गर्दीवर नियंत्रण आणणारे आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी होणे अपेक्षित असून नागरिकांचा या सर्व निर्बंधांना मिळणारा प्रतिसाद पाहूनच पुढील निर्णय घेतला जावा अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. गतवेळेपेक्षा काेरोचे व्यवस्थापन अधिक आव्हानात्मक असल्याचेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

नंदुरबार दौऱ्यावर असतांना मुख्यमंत्री ओझर विमानतळावर उतरले असता तेथे त्यांनी नाशिक जिल्ह्याचा काेरोना आढावा घेतला. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रत्ना रावखंडे उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, नागरिकांमध्ये लसीकरणाची जागृती वाढत आहे. त्यादृष्टीने नाशिक शहरातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मनपा आयुक्तांना दिले. गृहविलगीकरणात उपचार घेणाऱ्या रुग्णांवर लक्ष देण्याची गरज असून विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची सूचना ठाकरे यांनी पोलीस विभागाला केली.

--इन्फो--

मी जबाबदार’ भित्तीपत्रकांचे अनावरण

शासनाच्यावतीने ‘मी जबाबदार’ मोहिम सुरु करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने भित्तीपत्रकाच्या माध्यमातून मेाहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत भित्तीपत्रकांचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी त्रिसूत्री सोबतच लसीकरणाचा बाधित क्षेत्रामध्ये सुयोग्य वापर करून रुग्ण वाढ थांबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सिव्हिल सर्जन यांचेकडून आरोग्य विषयक विविध बाबींची माहिती घेतली.

--कोट--

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता या परिस्थितीचा सामना करण्यासाठी ऑक्सिजनचा पुरवठा, व्हेंटीलेशन बेड , रेमडिसिव्हर व अन्य औषधे यासह आवश्यक आरोग्य सुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून शासनाने घालून दिलेल्या टेस्ट -ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीची प्रभावी अंमलबजावणी सर्व यंत्रणा करतील असे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. मागील वर्षीची लाट व यावर्षीची लाट यातील क्षेत्रीय स्तरावरील विविध बाबी मधील फरक आणि त्यादृष्टीने प्रशासन करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती जिल्हाधिकारी यांनी मांडली.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मनपा नाशिक प्रशासनामार्फत सुरू असलेल्या विविध उपाययोजना जसे वैद्यकीय यंत्रणेचे बळकटीकरण, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची शोधमोहिम, बाधित क्षेत्रातील मनपा पोलीस पथकांची कार्यवाही इत्यादी बाबत माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली.

===Photopath===

190321\19nsk_28_19032021_13.jpg

===Caption===

ओझर विमानतळ येथे केारोना आढाबा बठकीप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे. समवेत मुख्य सचिव  सिताराम कुंटे, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड