शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

टाळ मृदुंगाच्या गजराने दुमदुमली नगरी

By admin | Updated: November 23, 2015 00:11 IST

संत नामदेव महाराज जयंतीनिमित्त दिंडी सोहळा

नाशिक : संत नामदेव महाराज यांच्या ७४६ व्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या दिंडी सोहळ्यात टाळ मृदुंगाच्या गजराने संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता. भक्तांनी दिंडीत सहभागी होत नामदेव महाराजांचा एकच गजर करीत भक्तिमय वातावरण निर्माण केले होते. बी. डी. भालेकर मैदान येथून दिंडीस प्रारंभ करण्यात आला. सजावट केलेल्या रथात संत नामदेव महाराजांचे १६ वे वंशज ह.भ.प. नामदास महाराज नामदेवांच्या पादुका घेऊन विराजमान झाले होते. तसेच रथात नामदेवांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. प्रतिमेचे पूजन आयोजक अरुण नेवासकर व अर्चना नेवासकर यांच्या हस्ते करण्यात आले. पालखीची मेनरोडमार्गे कापड बाजार येथून विठ्ठल मंदिर येथे हरिहर भेट कार्यक्रमात महाआरती करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशा पथक, भजनी मंडळ, लेजीम पथक आदिंसह पेशवाई थाटात अश्वावर विराजमान झालेल्या युवती दिंडीत सहभागी झाल्या. दिंडीत ‘बेटी बचाव’ हा संदेश लोकांना देण्यासाठी चित्ररथ सजवून जनजागृती करण्यात आली. याप्रसंगी श्रीकांत बेणी, साहित्यिक नंदन रहाणे, बारा बलुतेदार महासंघाचे प्रवक्ते दिलीपराव तुपे, नाना निकुंभ, विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष संदीप खैरनार, क्षत्रिय अहिर शिंपी समाज केंद्रीय संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जगताप, अंकुश पवार, ज्ञानेश्वर औसरकर, सूर्यकांत धटिंगण, शांता नेवासकर, शीला माळवे, अनुराधा धटिंगण, रंजना टिबे, दिलीप जगताप, अनिल नेवासकर, सतीश भांबेरे, रत्नाकर लुंगे, योगेश वारे, रमेश चांडोले, अरु ण भांबेरे, प्रवीण पवार, अजय देव्हारे, देवेन कल्याणकर, हेमंत सोनवणी, संजय खैरनार, रमेश नवले, राजेंद्र करमासे, दत्ता वावधाने, संजय गिते, अशोक जगताप, अमर सोनवणे, ज्ञानेश्वर चांडोले, योगेश वाडेकर, मदन बोरसे, प्रदीप जगताप, रोहन नेवासकर, सचिन बोरसे, शेखर निकुंभ, रवींद्र जाधव, अजय खैरनार आदि सहभागी झाले होते. दिंडीची सांगता नामदास महाराज यांनी पंढरपूर येथून आणलेल्या श्री नामदेवांच्या पवित्र पादुकांना रामकुंडात अमृताभिषेक करण्यात आला. यावेळी उपस्थित समाजबांधवांनी अमृतस्नानाची संधी साधली. कार्यक्रमाचा समारोप महाआरतीने करण्यात आला. (प्रतिनिधी)