शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव आयशरने दुचाकीस्वारास चिरडले

By admin | Updated: March 20, 2017 00:29 IST

सिडकोत अपघातांची मालिका : महिनाभरात तिघांचा आयशरखाली मृत्यू; नागरिकांचा संताप

सिडको : उत्तमनगरमधील वृद्धेचा आयशरखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच रविवारी (दि़१९) सायंकाळी पुन्हा भरधाव आयशरच्या धडकेत २१ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना सिडकोतील डीजीपीनगरमध्ये घडली़ या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव किरण साहेबराव सूर्यवंशी (२१, स्वामी समर्थ केंद्राजवळ, खुटवडनगर, सिडको, नाशिक, मूळ रा़ मुंगसे, ता़ मालेगाव) असे आहे़ या प्रकरणी अंबड पोलिसांनी आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे़अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुटवडनगरमधील किरण साहेबराव सूर्यवंशी हा युवक अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत कामास होता़ रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास किरण होंडा डिओ दुचाकीवरून (एमएच १५, एफई ०६९७) घरी येत होता़ तो माउली लॉन्सकडून खुटवडनगरला जात असताना डीजीपीनगर मिठास कॉर्नरजवळील पेट्रोलपंपासमोरून भरधाव येणाऱ्या आयशर वाहनाने (एमएच १५, एजी १९८) त्यास कट मारला़ यामुळे किरण सूर्यवंशी हा आयशरच्या मागील चाकाखाली सापडला़ त्यामध्ये त्याच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला़ या अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती़ किरण हा एकुलता एक मुलगा असून त्याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे़ दरम्यान, आदित्य खैरनार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिसांनी आयशरचालक बाळू वामन चव्हाण (५०, रा़ म्हाडा कॉलनी, अंबड लिंक रोड, सातपूर) विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला असून त्यास अटक केली आहे़ (प्रतिनिधी)