शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

जवान योगेश लांडगे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 00:57 IST

नायगाव : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जवान योगेश मनोहर लांडगे यांच्यावर मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

ठळक मुद्दे चिंचोली पंचक्र ोशीतील हजारो ग्रामस्थ व नातेवाइकांनी या जवानाच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.

नायगाव : भारतीय सैन्य दलात कार्यरत असलेले सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथील जवान योगेश मनोहर लांडगे यांच्यावर मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.गांधीनगर (गुजरात) येथून मंगळवारी सकाळी ९ वाजता लांडगे यांचे पार्थिव चिंचोली येथे पोहोचले. यावेळी सजवलेल्या रथातून लांडगे वस्तीपासून निघालेली अंत्ययात्रा गावातून योगेश लांडगे अमर रहे, भारत माता की जयच्या घोषणा देत स्मशानभूमी परिसरात पोहोचली. येथील स्मशानभूमीत त्यांचा मुलगा यशने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. देवळाली येथील आर्टिलरी सेंटरच्या जवानांनी बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून योगेश लांडगे यांना मानवंदना दिली. चिंचोली पंचक्र ोशीतील हजारो ग्रामस्थ व नातेवाइकांनी या जवानाच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली होती.यावेळी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष शीतल सांगळे, दीप्ती वाजे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातपुते, जिल्हा परिषद सदस्य सुनीता सानप, तहसीलदार राहुल कोताडे, नाईक सुभेदार सादिक मकाणदार, देवळाली आर्टिलरीचे जगदीशकुमार, मनोहर पाटील लिंगायत, गणेश उगले, नवनाथ ढमाले आदींनी श्रद्धांजली वाहिली. हजारोंच्या संख्येने जमलेल्या ग्रामस्थ, महिला, तरुण व शालेय विद्यार्थ्यांनी भूमिपुत्राला साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून चिंचोली गावावर योगेश यांच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. सरपंच दत्तू नवाळे, माजी सरपंच संजय सानप, सुरेश नवाळे, पोलीसपाटील मोहन सांगळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजु नवाळे, के.पी.आव्हाड , व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक सुदाम नवाळे, तलाठी अरुण फसाळे आदींसह ग्रामस्थ व तरुणांनी अंतिम संस्कार व पार्किंगसाठी जागा स्वच्छ केली.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केलेल्या योगेश यांनी २००८ साली भारतीय सैन्यदलात दाखल होऊन देशसेवेचे आपले स्वप्न पूर्ण केले. रविवारी सायंकाळी गांधीनगर (गुजरात) येथून गावी (चिंचोली, ता. सिन्नर) येण्यासाठी रेल्वेचे तिकीट आरक्षित करण्यासाठी योगेश आपल्या दुचाकीवरून जात होते. यावेळी झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी सविता, मुलगा यश, मुलगी अदिती, भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे.