शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकसह त्र्यंबकेश्वर तालुक्यातील रस्त्यांना निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 00:38 IST

त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देदहा कोटी मंजूर : रस्त्यांचे लवकरच नूतनीकरण

त्र्यंबकेश्वर : गेल्या २० ते २५ वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे -विल्होळी हा प्रमुख जिल्हा मार्ग तसेच वाडीवऱ्हे-दहेगाव-जातेगाव-महिरावणी ते गिरणारे-वाघेरा हा राज्य महामार्ग यासाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा निधी शासनाने मंजूर केला असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली आहे.अंजनेरी-मुळेगाव-जातेगाव ते गौळाणे-विल्होळी ह्या प्रमुख जिल्हा मार्गासाठी चार कोटी ८७ लाख ९३ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.त्यानुसार या रस्त्याचे लवकरच नूतनीकरण होणार आहे. तसेच वाडीवऱ्हे, दहेगाव, जातेगाव, महिरावणी ते गिरणारे, वाघेरा हा राज्य महामार्गही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. याही रस्त्याचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी या निधीला मंजुरी दिली आहे. या भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल नाशिकसह इतर बाजारपेठांमध्ये वाहतूक करणेकामी सुलभ व्हावे तसेच अंजनेरीच्या गडावर येणाऱ्या भाविकांना थेट गडावर येणे सोपे व्हावे यासाठी खासदार गोडसे यांनी अंजेनरी-मुळेगाव रस्त्यासाठी केंद्राकडे मागणी केली होती. गडकरी यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील चार विशेष रस्ता कामांसाठी तब्बल १४ कोटी १३ लाखांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना शेतमाल इतरत्र वाहतूक करण्यासाठी जलद रस्ते उपलब्ध होणार असून, तसेच या रस्त्याच्या नूतनीकरणामुळे पर्यटन विकासाला अधिकाधिक चालना मिळण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा