शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दलितवस्ती कामांंच्या निधी नियोजनावरून जुंपणार

By admin | Updated: November 27, 2015 23:44 IST

३५ कोटींचा निधी : नियमानुसारच नियोजनाची समितीची मागणी

नाशिक : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला दलितवस्तीच्या कामांसाठी सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात मंजूर व प्राप्त झालेल्या ३५ कोटींच्या निधी नियोजनावरून आता संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत. या संघर्षात निधी मात्र अखर्चित राहण्याची शक्यता बळावली आहे.सर्वसाधारण सभेत समाजकल्याण विभागाला दलितवस्तीच्या कामांसाठी ३५ कोटींचा निधी उपलब्ध झाला असून त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. त्यात या निधी नियोजनाचे व नियंत्रणाचे अधिकार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना देण्याचा ठराव संमत करण्यात आला आहे. त्यामुळे समाजकल्याण समितीचे सदस्य व सभापती यांचा हिरमोड झाला असून या निधी नियोजनाचे नियमानुसार अधिकार जिल्हा परिषद समाजकल्याण समिती व शासनाने ठरवून दिलेल्या निकषांना असल्याचे आता समिती सदस्य सांगत आहेत. त्यामुळे निधी नियोजन व नियंत्रण देण्याचा ठराव नेमका का व कशासाठी करण्यात आला, याबाबत समाजकल्याण समिती सदस्यांमध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुळातच शासन नियमानुसार दलितवस्तींमध्ये कोणती कामे कशी घ्यावीत आणि त्यांचा प्राधान्यक्रम कसा असावा, याबाबत स्पष्ट निर्देश असून त्या निर्देशानुसारच जर कामांची निवड करायची आहे. मग या अधिकार देण्याच्या ठरावाला मुळात अर्थ काय? अशी एक चर्चा जिल्हा परिषदेत सुरू आहे. विशेष म्हणजे दलितवस्त्यांमध्ये प्रत्येकी पाच कामे सुचविण्याबाबत जिल्हा परिषद सदस्यांना काही पदाधिकाऱ्यांकडून दूरध्वनी करण्यात आल्याचीही चर्चा आहे. जर सदस्यांनी सुचविलेली प्रस्तावित कामे दलितवस्तींमध्ये घ्यावयाच्या कामांच्या निकषात बसत नसतील, तर मग ही कामे सुचविण्याला अर्थ काय? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे. तूर्तास सर्वसाधारण सभा होऊन एक महिन्याचा कालावधी लोटत आला तरी या ३५ कोटींच्या कामांना अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. (प्रतिनिधी)