शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

देवळाली छावणी परिषदेला विकासासाठी निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 01:00 IST

राज्यातील छावणी परिषदेला विकासकामासाठी शासनाचे कर भरूनही निधी उपलब्ध होत नव्हता. याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांच्या आदेशान्वये राज्य शासनाने कॅबिनेट बैठकीत राज्यातील सातही छावणी परिषदेला निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

देवळाली कॅम्प : राज्यातील छावणी परिषदेला विकासकामासाठी शासनाचे कर भरूनही निधी उपलब्ध होत नव्हता. याबाबत केंद्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर संरक्षणमंत्र्यांच्या आदेशान्वये राज्य शासनाने कॅबिनेट बैठकीत राज्यातील सातही छावणी परिषदेला निधी उपलब्ध करून देण्यास मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.  राज्यात देवळाली, देहू, खडकी, पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, कामटी या सात ठिकाणी छावणी परिषद आहे. त्यापैकी खडकी, पुणे, देहू, औरंगाबाद व अहमदनगर या पाच छावणी परिषद महानगरपालिका क्षेत्रालगत असून, देवळाली व कामटी यांचे कार्यक्षेत्र नगरपरिषदलगत  आहे. राज्य शासनाने केलेल्या जनगणनेनुसार छावणी परिषद हद्दीतील रहिवाशांची आकडेवारी ही शहरी भागात गणली आहे. येथील रहिवासी शासनाचे विविध कर नियमित भरत असूनही त्यांना राज्य शासनाचा कोणताही निधी मिळत नव्हता. गेल्या महिन्यात दिल्ली येथे झालेल्या देशभरातील छावणी परिषदेच्या बैठकीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्य शासनाकडे संबंधित छावणी परिषदेला विकासकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदेशित केल्याने राज्य शासनाच्या कॅबिनेट बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे देवळाली छावणीच्या हद्दीत विकासकामांना चालना मिळणार आहे.दोन वर्षांपासून प्रयत्नगेल्या दोन वर्षांपासून राज्य व केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता, असे खासदार गोडसे यांनी सांगितले. नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या, परिसरातील क्षेत्राचा विकास व्हावा, याशिवाय मिळणारा निधी नियमित असावा, अशी मागणी सातत्याने केली होती. संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनादेखील याबाबत माहिती दिली होती, असे गोडसे यांनी सांगितले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना