शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बॅँकेत अडकला पंचायत समित्यांचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 00:58 IST

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या १५ पंचायत समित्यांचा विविध योजना राबविण्याचा निधी अडकून पडला आहे. सदरचा निधी बँकेकडून पंचायत समितीकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने योजनांची शिल्लक रक्कम पंचायत समितींना त्वरित वितरित करण्याचे आश्वासन केदा आहेर यांनी याप्रसंगी दिले.

ठळक मुद्देयोजना रखडल्या : लाभ मिळण्यासही विलंब

नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत जिल्हा परिषद अधिनस्त असलेल्या १५ पंचायत समित्यांचा विविध योजना राबविण्याचा निधी अडकून पडला आहे. सदरचा निधी बँकेकडून पंचायत समितीकडे वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने योजनांची शिल्लक रक्कम पंचायत समितींना त्वरित वितरित करण्याचे आश्वासन केदा आहेर यांनी याप्रसंगी दिले.जिल्हा परिषदेच्या नावीन्यपूर्ण योजना, नैसर्गिक आपत्ती, टंचाई, डॉ. अब्दुल कलाम आहार योजना, समाजकल्याण योजना, पेन्शन उपदान, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, महिला व बालकल्याण योजनांची रक्कम नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत अडकून पडली आहे. त्यामुळे सदरच्या लोकोपयोगी योजना राबविण्यास तसेच गरजू लाभार्थींना लाभ मिळण्यास विलंब होत आहे. सदरची बाब लक्षात घेऊन डॉ. गिते यांनी याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा करून सदरचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करण्याची मागणी केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने याबाबत त्वरित निर्णय घेऊन सदरचा निधी पंचायत समित्यांना वर्ग करणार असल्याचे आश्वासन केदा आहेर यांनी यावेळी दिले.