शहरं
Join us  
Trending Stories
1
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
2
धनुष्यबाणावर आज फैसला? शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी; आमदार अपात्रतेवरही येणार निकाल
3
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर
4
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
5
दिल्ली स्फोटातील 10 पैकी 8 मृतदेहांची ओळख पटली; इतर दोन मृतदेह दहशतवाद्यांचे? तपास सुरू...
6
Delhi Blast: हल्ल्याच्या १० दिवस आधी कुठे होती 'ती' i20 कार? मोठी माहिती उघड, तपासाला वेग
7
STP ही एसआयपीपेक्षा वेगळी कशी? काय आहेत फायदे-तोटे? कुणासाठी आहे बेस्ट?
8
भाजप निरीक्षकांनी दिलेल्या नावांवर होणार शिक्कामोर्तब, नगराध्यक्ष, नगरसेवकांची ९५ टक्के नावे फायनल; संघटनेवर विश्वास
9
Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
10
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
11
"ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय"; तुळजापूरातील आरोपीच्या भाजप प्रवेशावरून सुप्रिया सुळेंचे मुख्यमंत्र्यांना थेट पत्र
12
१३९ दिवस मंगळ अस्त: ७ राशींचे मंगल होईल, बक्कळ लाभ; इच्छा पूर्ण, २ राशींना अमंगलाचे संकेत!
13
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
14
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
15
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
16
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
17
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
18
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
19
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
20
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?

अ‍ॅपल बोराचे पीक घेत फुलविली बाग

By admin | Updated: December 23, 2014 22:21 IST

खामखेडा : पारंपरिक शेतीऐवजी प्रयोगशीलतेचा पाठ

खामखेडा : येथील शिवाजी लक्ष्मण बोरसे या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देऊन मोठ्या जिद्दीने अ‍ॅपल बोराची लागवड करून प्रयोगशीलतेचा नवा आदर्शपाठ घालून दिला.शेती व्यवसायात वारंवार एकच पीक घेऊन सतत धोका पत्करण्यापेक्षा प्रयोग करून पाहणेही फायद्याचे ठरू शकते, असा विचार करून शिवाजी बोरसे यांनी आपल्या शेतात अ‍ॅपल बोराची लागवड करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन-तीन वर्षांपासून डाळिंबाच्या बागांवर तेल्या रोगाने मोठ्या प्रमाणात थैमान घातल्यामुळे सर्व खर्च वाया गेला होता. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत होता व आजही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे परिस्थितीवर मात करीत यापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या उद्देशाने बोरसे यांनी हा प्रयोग करून पाहिला.त्यांनी आपल्या शेतकरी मित्राच्या सल्ल्यानुसार थायलंड जातीच्या बोराच्या झाडांची लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यामार्फत या अ‍ॅपल बोराच्या पिकाविषयी माहिती घेऊन बोराच्या रोपांची लागवड केली. त्यांनी शेतजमिनीचा पुरेपूर वापर व पाण्याचे योग्य नियोजन केले. सफरचंदांच्या आकाराइतके असलेल्या या बोराचे पीक पाहून परिसरातील इतर शेतकरी, ग्रामस्थही प्रभावित झाले. अनेक शेतकरी बोरसे यांच्या बागेला भेट देऊन चौकशी करत आहेत. सध्या गुजरात, अहमदाबाद, मालेगाव, नाशिक आदि ठिकाणी अ‍ॅपल बोर विक्रीस जात आहेत. शिवाजी बोरसे हे वसाका कारखान्यात मुख्य लेखापाल म्हणून नोकरीस होते; परंतु लहानपणी वडिलांना शेतीच्या कामात मदत करीत असताना त्यांना शेतीची आवड निर्माण झाली व त्यांनी आजपर्यंत शेतात अनेक प्रकारच्या फळबागांची लागवड करून वेगवेगळे प्रयोग केले आहेत. (वार्ताहर)