शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात २० पासून इंधन दर कमी

By admin | Updated: August 9, 2015 22:28 IST

राज्यात २० पासून इंधन दर कमी

मालेगाव कॅम्प : पेट्रोल व डिझेल वरील एलबीटी रद्द होऊन लवकरच या वस्तूंवर सुधारित कर प्रणाली आकारून यावरील दरांवर नियंत्रण येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विक्रेत्यांना दिले. त्यामुळे येत्या २० तारखेपासून राज्यासह मालेगावी इंधन दर कमी होतील, असे जिल्हा पेट्रोल, डिझेल असोसिएशनचे उपाध्यक्ष भूषण भोसले यांनी सांगितले.राज्यात १ आॅगस्टपासून एलबीटी रद्द करण्यात आला. अनेक उद्योग- धंद्यांवर हा नियम लागू झाला; परंतु काही तांत्रिक मुद्द्यांमुळे पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी रद्द करण्यास शासनाने नकार दिला होता. त्यामुळे पेट्रोल विक्रेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली व त्यांनी येत्या १० आॅगस्टपासून बेमुदत बंदचे आयोजन केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेडरेशन आॅफ आॅल महाराष्ट्र डिलर असोसिएशनच्या प्रमुख नेत्यांशी याबाबत चर्चा झाली. चर्चेत प्रामुख्याने पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी, एसएससी (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज), व्हॅटच्या करांवर सकारात्मक चर्चा झाली. संघटनेतर्फे प्रामुख्याने दोन मागण्या मांडल्या. यात पेट्रोल, डिझेलवरील एलबीटी स्थानिक व्हॅट ज्यांचे वार्षिक उत्पन्न ३०० कोटी रुपयांच्या आत आहे हे कर महाराष्ट्रात जीवनावश्यक म्हणून रद्द करावे ज्यामुळे राज्यातील महापालिकांमधील शहरांमध्ये जनतेला ३ ते ५ रुपयांनी इंधन स्वस्तात मिळेल. तर एसएससी (स्टेट स्पेसिफिक सरचार्ज) हा कर महाराष्ट्रातच इंधन निधीवर आकारला जातो. त्यामुळे लांब पल्ल्यांची वाहने शेजारील राज्यात इंधन भरतात. यामुळे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे शासनाने एलबीटी, एसएससी कर रद्द करावेत. मुख्यमंत्र्यांनी येत्या २० तारखेला याबाबत निर्णय घेऊन कर कमी करण्याचे संकेत दिले. (वार्ताहर)