शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरी नगर परिषदेवर कचराडेपेाच्या निषेधार्थ मोर्चा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, आठवले गटाच्या पदाधिकार्‍यांचे नेतृत्व

By admin | Updated: May 28, 2014 01:01 IST

इगतपुरी- शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासीबांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडीतील शेकडो महिला-पुरुषांनी नगर परिषदेवर आज मोर्चा काढला. मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.

इगतपुरी- शहरातील गोळीबार मैदान येथील कचरा डेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासीबांधवांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचरा डेपोची पावसाळ्याअगोदर जेसीबीच्या सहाय्याने साफसफाई करण्यात यावी या मागणीकरिता रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गटाचे पदाधिकारी आणि गोळीबारवाडीतील शेकडो महिला-पुरुषांनी नगर परिषदेवर आज मोर्चा काढला. मुख्याधिकारी व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.शहरातील धम्मगिरीच्या मागे नगर परिषदेचा कचरा डेपो आहे. या कचराडेपोमुळे गोळीबारवाडीतील आदिवासी नागरिक त्रस्त आहेत. गोळीबारवाडीकडे जाणार्‍या मुख्य सीमेंट रस्त्यावर कचरा साचत असल्याने वाहतुकीला अडचणी निर्माण होत आहेत. या कचरा डेपोमुळे जवळच नव्याने वसलेल्या श्री स्वामी समर्थ नगरवासीयांना प्रचंड दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, या डेपोजवळून वाहणार्‍या नाल्यात हा कचरा जमा झाल्याने हा नाला तुंबला असून, ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांनाही दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा सुरू होण्याअगोदर सदर परिसराची साफसफाई करण्यात यावी, जेसीबी मशीनच्या सहाय्याने गोळीबारवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील कचरा दूर करावा, नाल्यात साचलेला कचरा काढून घ्यावा आदि मागण्या करण्यात आल्या आहेत.या डेपोचा आढावा घेऊन आठ दिवसांत साफसफाई न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना देण्यात आला आहे. या मोर्चात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष सुनील रोकडे, जि.सेक्रेटरी लक्ष्मणराव कांबळे, बाळासाहेब गांगुर्डे, चंद्रकांत शिंदे, श्रावण झुगरे, कृष्णा कामडी, काशीनाथ कामंडी, गंगूबाई कामडी, पुष्पा कामडी, प्रमिला झुगरे, सुशीला पिंगळे आदि सहभागी झाले होते. (वार्ताहर)---