शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १५ आॅगस्टपासून संगणकीय सातबारा वितरण्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 17:18 IST

नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली आहे.राज्य सरकारने संगणकीय सातबारा देण्यासाठी वर्धा व नाशिकची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती, त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून ...

नाशिक : प्रत्येक नागरिकाचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सातबारा उताºयाचे संगणकीकरणाचे काम जिल्ह्यात ९७ टक्के पूर्ण झाले असल्याने येत्या १५ आॅगस्टपासून खातेदारास संगणकीय सातबारा उतारा देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम् राधाकृष्णन् यांनी दिली आहे.राज्य सरकारने संगणकीय सातबारा देण्यासाठी वर्धा व नाशिकची पायलट प्रोजेक्टसाठी निवड केली होती, त्यानुसार गेल्या काही वर्षांपासून हस्तलिखित सातबारा उताºयाचे संगणकीयकरणाचे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी तलाठ्यांना लॅपटॉपचे वाटप करण्याबरोबरच इंटरनेटची जोडणीही देण्यात आली, तथापि, अतिशय किचकट असलेल्या या कामात वेळोवेळी तांत्रिक दोषही निर्माण झाल्याने हे काम वर्षानुवर्षे रखडले. अखेर जिल्ह्यातील १२ लाख १८ हजार १७३ खातेदारांपैकी ११ लाख ८३ हजार ३३२ खातेदारांचे संगणकीकरण करण्यात आले असून, त्याचे प्रमाण ९७.१४ टक्केइतके आहे. अद्याप ३४ हजार ८४१ खातेदारांचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील पेठ तालुक्यात शंभर टक्के संगणकीकरण झाले असून, नाशिकमध्ये सर्वांत कमी म्हणजेच ८९.८० टक्के इतके काम झाले आहे. नाशिक शहरात दोन लाख १० हजार ४७३ खातेदार असून, त्यापैकी एक लाख ८९ हजार ००६ इतक्या खातेदारांचे संगणकीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. येत्या दहा दिवसांत अपूर्ण काम पूर्ण करून १५ आॅगस्ट रोजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या लोकप्रतिनिधींच्या हस्ते संगणकीय सातबारा उताºयाचे वाटप करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले.जिल्ह्यात ज्या ठिकाणी हस्तलिखित व संगणकीय सातबारा उतारा तंतोतंत जुळले अशा ठिकाणी १ जानेवारी २०१७ पासूनच सातबारा उतारे आॅनलाइन पद्धतीने व डिजिटल सिग्नेचर वापरून नागरिकांना देण्यात येत असून, आजपावेतो ६,४८४ इतके उतारे वाटप करण्यात आल्याचे ते म्हणाले. सातबारा उताºयासाठी तलाठी व मंडळ अधिकाºयाच्या कार्यालयाच्या चकरा टाळण्यासाठी नागरिकांनी ‘आपलं सरकार’ या पोर्टलचा वापर करून डिजिटल स्वाक्षरीचे साताबारा उतारा प्राप्त करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.