शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही नोकरीत सवलत शासनाचा निर्णय : जवळचे नातेवाईक संज्ञेत समावेश

By admin | Updated: May 27, 2014 01:36 IST

नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही आता शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या सवलती मिळणार असून, तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जारी केला असला, तरी किती जणांना याचा प्रत्यक्षात लाभ मिळेल याबाबत साशंकताच आहे.

नाशिक : स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींनाही आता शासन सेवेत नियुक्तीसाठी असलेल्या सवलती मिळणार असून, तसा शासननिर्णय जारी करण्यात आला आहे. शासनाने हा निर्णय जारी केला असला, तरी किती जणांना याचा प्रत्यक्षात लाभ मिळेल याबाबत साशंकताच आहे. १९८५ च्या शासननिर्णयात स्वातंत्र्यसैनिकावर अवलंबून असलेले जवळचे नातेवाईक कोण याबाबत स्पष्टता करण्यात आलेली आहे. त्यामध्ये जवळचे नातेवाईक या संज्ञेत स्वातंत्र्यसैनिकाच्या विवाहित मुलीचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यासंदर्भात श्रीमती मीना दिनकर देशमुख तथा श्रीमती मीना संजय बावस्कर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने १३ फेबु्रवारी २०१२ रोजी निकाल देत स्वातंत्र्यसैनिकाचा जवळचा नातेवाईक म्हणून त्याच्या विवाहित मुलीचादेखील समावेश करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार सदर प्रस्ताव शासनाच्या विचाराधिन होता. त्यानुसार शासनाने १९ मे २०१४ रोजी शासननिर्णय जारी करत स्वातंत्र्यसैनिक अथवा त्याचे नामनिर्देशित पाल्य यांना शासन सेवेतील नियुक्तीकरिता असलेल्या सवलतींसाठी त्याच्या विधवा पत्नी अथवा त्याच्या विवाहित मुलीसही नामनिर्देशित करण्यास मान्यता दिली आहे. सदर आदेश हे शासकीय-निमशासकीय सेवा, शासनाचे उपक्रम, महामंडळे, मंडळे, शासन अनुदानित संस्था व ज्यांना मार्गदर्शक सूचना देण्याचा अधिकार शासनाला आहे अशा सर्व संस्था व सेवा यामधील नियुक्त्यांसाठी लागू राहणार आहे. शासनाचे उपसचिव दि. रा. डिंगळे यांच्या स्वाक्षरीने नुकताच हा आदेश निर्गमित झाला आहे. स्वातंत्र्यसैनिकाचा वारस असलेल्या मुलासच शासन सेवेतील नियुक्तीत सवलतीचा लाभ दिला जात होता; परंतु ज्यांना मुलीच आहेत पण त्या विवाह होऊन सासरी गेल्या असतील त्यांना या लाभापासून वंचित राहावे लागत होते. शासनाच्या या निर्णयाने स्वातंत्र्यसैनिकांच्या विवाहित मुलींना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, शासननियुक्तीबाबत एकूणच नियम व निकष पाहता वयोमर्यादा उलटून गेलेल्या अनेक विवाहित मुलींना त्याचा कितपत लाभ मिळेल याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.