शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

नासाका विक्रीचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 01:09 IST

नाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू असल्याने बँकेने त्यांनी  ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले होते. या ना हरकत प्रमाणपत्रामुळे लिलाव प्रक्रि या राबविण्यास अडथळा ...

नाशिक : सहकारी साखर कारखाने अडचणीत सापडलेले असताना महत्त्वाचे असलेले नाशिक व निफाड सहकारी साखर कारखान्यांचा वसुलीसाठी लिलाव करण्यास संचालक मंडळाने मंजुरी दिली होती. मात्र, नाशिक कारखाना सुरू करण्यासाठी शासनस्तरावरून हालचाली सुरू असल्याने बँकेने त्यांनी  ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) दिले होते. या ना हरकत प्रमाणपत्रामुळे लिलाव प्रक्रि या राबविण्यास अडथळा येत होता. अखेर जिल्हा बँकेने नासाका दिलेला ना हरकत प्रमाणपत्राचा दाखलादेखील गुरुवारी रद्द केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे नासाका विक्र ीचा मार्ग खुला झाला आहे.लिलाव प्रक्रीयेसाठी पुण्यातील मिटकॉन कंपनीला मूल्य निर्धारित करण्याचा कंत्राट दिले होते. मिटकॉनने दोन्ही कारखान्यांचे मूल्य काढून आपला अहवाल सादर केला होता. या अहवाल ३१ जुलै झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ठेवण्यात ठेवून कारखाने लिलावाचा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला होता. यास संचालक मंडळाने मंजुरी देत लिलाव प्रक्रि येसदेखील संचालकांनी मंजुरी दिली होती. याच दरम्यान, नासाका पुन्हा सुरू करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत मंबईत बैठक झाली. या बैठकीत नासाकाला शासकीय हमी देण्यास सरकारने नकार देत प्रशासकीय मंडळाने वैयक्तिक हमीवर कारखाना सुरू करण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे नासाका सुरू करण्याची चिन्हे होती. त्यासाठी जिल्हा बँकेची एनओसीदेखील मिळविली होती. बँकेने दिलेल्या या एनओसीमुळे नासाका लिलाव प्रक्रि येत अडथळा निर्माण झालेला होता. मात्र, नासाका सुरू होण्याबाबत कोणत्याही हालचाली दिसत नसल्याने गुरुवारी (दि.१०) जिल्हा बँकेने नासाकाला दिलेली ना हरकत प्रमाणपत्र रद्द केली असल्याचे पत्र नासाका प्रशासकीय मंडळाला दिले. त्यामुळे ही ना हरकत प्रमाणपत्र रद्द झाल्याने आता नासाका विक्र ीचा मार्ग खुला झाला आहे. लवकरच पुढील प्रक्रि या सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. नासाका कारखान्यांकडे ९७ कोटी, तर निफाड कारखान्यांकडे १२५ अशी एकूण २३२ कोटींची थकबाकी जिल्हा बँकेकडे आहे. अडचणीत सापडलेल्या जिल्हा बँकेच्या कार्यकारी संचालकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राजेंद्र बकाल यांनी जप्त केलेल्या निफाड व नाशिक सहकारी साखर कारखान्यांचे लिलाव करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार बँकेने या दोन्ही कारखान्यांचे लिलाव करण्याच्या प्रक्रि येस सुरुवात केली.