शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

मद्य दुकानांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 00:08 IST

नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने सरसकट बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दीड वर्षांपूर्वीच्या निर्णयात न्यायालयानेच फेरविचार याचिकेत बदल केल्यामुळे व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास अनुमती दिल्याने नाशिक जिल्ह्यातील १७२ बिअर बार, परमीट रूम व वाइन शॉप सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ज्या दुकानांचे परवाने नूतनीकरण झाले नसेल त्यांना मात्र दोन वर्षांचे शुल्क भरूनच अनुमती दिली जाणार आहे.

ठळक मुद्देग्रामपंचायत हद्द : तीर्थस्थळांचा अपवाद परवाना नूतनीकरणाची अट कायम

नाशिक : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या पाचशे मीटर अंतराच्या आत असलेली मद्यविक्रीची दुकाने सरसकट बंद करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दीड वर्षांपूर्वीच्या निर्णयात न्यायालयानेच फेरविचार याचिकेत बदल केल्यामुळे व ग्रामीण भागातील ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने सुरू करण्यास अनुमती दिल्याने नाशिक जिल्ह्यातील १७२ बिअर बार, परमीट रूम व वाइन शॉप सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. ज्या दुकानांचे परवाने नूतनीकरण झाले नसेल त्यांना मात्र दोन वर्षांचे शुल्क भरूनच अनुमती दिली जाणार आहे.डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेच्या सुनावणीत देशभरातील राष्टÑीय व राज्य महामार्गावर पाचशे मीटर अंतराच्या आत असलेल्या मद्यविक्रीच्या दुकानांवर सरसकट बंदी लादली होती. न्यायालयाच्या या आदेशाची अंमलबजावणी १ एप्रिल २०१७ पासून करण्याच्या सूचनाही राज्य सरकारांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सुमारे ७५१ मद्यविक्रीच्या दुकानांवर गंडांतर आले होते. न्यायालयाच्या या निर्णयामुळे परमीट रूम, बिअर बार चालक, वाइन शॉप विक्रेत्यांचा व्यवसाय मोडकळीस येऊन मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली होती. या संदर्भात चंदीगढ उच्च न्यायालयाच्या एका निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्याच निर्णयात फेरबदल करण्याची तयारी दर्शविली होती व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतीच्या हद्दीतून जाणाऱ्या राष्टÑीय व राज्य महामार्गावरील मद्यविक्रीच्या दुकानांना बंदीतून वगळण्याचा निर्णय सप्टेंबर महिन्यात मागे घेण्यात आला व ग्रामीण भागातील दुकानांसाठी मात्र सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय कायम होता. गेल्या वर्षभरापासून ग्रामीण भागात व विशेषत: ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने बंद असताना ३१ मार्च रोजी शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा हवाला देत ग्रामपंचायत हद्दीतील दुकाने सुरू करण्याची अनुमती दिली आहे.नवीन अनुमतीनुसार आता ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या सात हजार इतकी असेल तेथील मद्यविक्रीचे दुकान सुरू करता येणार आहे. ज्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत औद्योगिक वसाहत असेल व त्याची लोकसंख्या सात हजारांच्या आत असेल अशा ग्रामपंचायतीच्या हद्दीतही दुकान सुरू करता येईल. महाराष्टÑ पर्यटन विकास महामंडळाने ज्या ग्रामपंचायतीला पर्यटन क्षेत्र म्हणून घोषित केले असेल त्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतही मद्यविक्रीची अनुमती देण्यात येणार असून, ज्या ग्रामपंचायतीचा विकास आराखडा मंजूर असेल अशा ग्रामपंचायत हद्दीतही न्यायालयाने मद्यविक्री करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायतींच्या हद्दीतील दुकानांचा मार्ग मोकळा झाला आहे.परवाना शुल्क भरणे अनिवार्य ग्रामपंचायत हद्दीतील मद्यविक्रीची दुकाने पुन्हा सुरू करण्यास अनुमती देताना ज्या दुकानांच्या परवान्यांची मुदत संपुष्टात आली असेल त्यांच्याकडून परवाना शुल्क भरून घेण्यात येईल. ज्यांनी एक वर्षापेक्षा अधिक वर्षांच्या परवाने शुल्काचा भरणा केला असेल त्यांना तत्काळ व्यवसाय सुरू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील १७२ ग्रामपंचायत हद्दीतील दुकानांपैकी ५४ दुकानांचे शुल्क आगावू भरण्यात आल्याने ते तत्काळ सुरू करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.