सटाणा:तालुक्यातील मोरेनगर येथील शिक्षक सोपान गोकुळराव खैरनार यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०१५ साली भारत सरकारने शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्ली येथे देऊन गौरविण्यात आले होते. खैरनार यांच्या दिव्यांगवत्वावर मात करून मिळवलेल्या या कार्याची दखल घेत सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोपान खैरनार व त्यांच्या सोबत बस प्रवास करणाº्या जोडीदाराला अजीवन मोफत प्रवास पास देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली. रापम चे नाशिक विभागाचे वाहतूक नियंत्रक रणजित ढाकणे , वरिष्ठ अधीक्षक सुभाष जाधव , वाहतूक शाखेचे सहायक एम पी पवार आदी च्या हस्ते खैरनार यांना मोफत प्रवास पास प्रदान करण्यात आला.(20सटाणा पास)
सोपान खैरनार यांना मोफत प्रवास पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:58 IST
सटाणा:तालुक्यातील मोरेनगर येथील शिक्षक सोपान गोकुळराव खैरनार यांच्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्याची दखल घेऊन त्यांना सन २०१५ साली भारत सरकारने शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार दिल्ली येथे देऊन गौरविण्यात आले होते.
सोपान खैरनार यांना मोफत प्रवास पास
ठळक मुद्देखैरनार यांच्या दिव्यांगवत्वावर मात करून मिळवलेल्या या कार्याची दखल घेत सामाजिक जाणिवेतून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोपान खैरनार व त्यांच्या सोबत बस प्रवास करणाº्या जोडीदाराला अजीवन मोफत प्रवास पास देऊन त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली.