शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

कळवण येथे कौशल्यविकासचे मोफत प्रशिक्षण

By admin | Updated: August 1, 2016 00:15 IST

कळवण येथे कौशल्यविकासचे मोफत प्रशिक्षण

 कळवण : केंद्र सरकारने प्रमोद महाजन कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागामार्फत मानूर येथील स्वामी विवेकानंद औद्योगिक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्रात इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अप्लायन्सेस व वेल्डर या दोन व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष दगडू रामचंद्र सोनवणे यांनी दिली. खेडेगावातील तरुणांचे लोंढे रोजगारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गाव ओस पडू लागली आहेत, तर शहरातील गर्दी वाढत आहे. खेड्ड्यातील सुशितक्षत बेरोजगार तरुणांना स्थानिक ठिकाणीच स्वत:चा रोजगार सुरु करता यावा. यासाठी केंद्र शासनाने प्रमोद महाजन कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागाअंतर्गत ‘कौशल्य विकास’ कार्यक्रम हाती घेतला आहे.या कार्यक्र माअंतर्गत मानूर येथील स्वामी विवेकानंद औद्योगिक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण केंद्र येथे इलेक्ट्रिशियन डोमेस्टिक अप्लायन्सेस (घरातील सर्व विद्युत उपकरणे दुरूस्ती) व वेल्डर (आर्क अ‍ॅण्ड गॅस वेल्डर ) हे दोन व्यवसाय अभ्यासक्रम सरू झालेले आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाचा कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असून, हे प्रशिक्षण कौशल्यविकास योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत आहे.कळवण तालुक्यातील आठवी, नववी व दहावी पास व नापास विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. इच्छुकांनी प्रवेश व अधिक माहितीसाठी ९७६६८५३५८६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले. प्रवेश घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड, शाळा सोडल्याचा दाखल, पासपोर्ट साईज फोटो, मार्कशीट, रहिवाशी दाखला आदी कागदपत्रांची पुर्तता करावी असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)