पंचवटी : सध्या शहरात पाणीकपात सुरू झाल्याने नागरिकांना दोन ऐवजी एकच वेळ पाणीपुरवठा केला जात आहे. पंचवटीतील प्रभाग क्रमांक १ मध्येदेखील अशीच परिस्थिती असून नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये यासाठी नगरसेवक गणेश चव्हाण यांनी स्वखर्चातून पाण्याचा टॅँकर उपलब्ध करून दिला आहे. सध्या प्रभागात मोफत टॅँकरने पाणीपुरवठा केला जात असून, चव्हाण यांनी सुरू केलेल्या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत केले आहे. प्रभागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली होती. त्यातच काही दिवसांपासून एकवेळ व अपुऱ्या दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय होऊ नये यासाठी प्रभागात सध्या टॅँकरने मोफत पाणीपुरवठा केला जात आहे.
प्रभाग १ मध्ये मोफत टॅँकरसेवा
By admin | Updated: March 2, 2016 23:57 IST