नाशिक : १९७२ साली ठाणे शहरातून सुरू झालेल्या टीजेएसबी बॅँके ने देशात ११० शाखांमधून सेवा देत १०१ कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे. पुढील वर्षात १२५ शाखांचा टप्पा बॅँक पूर्ण करणार असून, ठाणे शहरानंतर नाशकात आमच्या बॅँकेने प्रथम शाखा सुरू केली आणि नाशिककरांच्या साथीने झालेली बॅँकेची ही सुरुवात चांगली झाली असून, बॅँकेने शाखांचेही शतक पूर्ण केले आहे, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश उतेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या आर्थिक वर्षामध्ये टीजेएसबी बॅँकेला रुपये १०१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. देशातील महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात या राज्यांमध्ये सेवा देत बॅँकेने ११ हजार ६०० कोटींचा एकूण व्यवसाय केल्याचे उतेकर यांनी यावेळी सांगितले. बॅँकेने मिळविलेला हा नफा सहकारी बॅँकिंग क्षेत्रातील उच्चांक असल्याचे ते यावेळी म्हणाले. आधुनिक बॅँकिंग तंत्रज्ञान, पारदर्शक व्यवहार, ग्राहकाभिमुख सेवा, व्यावसायिक व्यवस्थापन आणि कुशल मनुष्यबळ या आधारावर बॅँकेने हे यश मिळविले आहे, असे उतेकर यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी बॅँकेचे संचालक विवेक पत्की, रमेश कनानी, विद्याधर वैशंपायन, मुख्य सरव्यवस्थापक सुनील साठे उपस्थित होते. बॅँकेच्या या आर्थिक वर्षातील एकूण ठेवी सात हजार १९० कोटींच्या असून, बॅँकेने चार हजार ४१० कोटींचे क र्जवाटप केले आहे. या माध्यमातून बॅँकेला १६२ कोटींचा ढोबळ नफा, तर १०१ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. बॅँकेचा फॉरेक्स व्यवसाय एक हजार ५४६ कोटींचा झाला आहे. केंद्र सरकारच्या अहवालानुसार बॅँक लघुमध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेण्यात असून, बॅँकिंग सुविधा तळागाळातील जनतेपर्यंत नेण्यासाठी विशेष योजनांची आखणी करणार आहे. या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी रिझर्व्ह बॅँकेच्या निर्देशानुसार व्यावसायिक प्रतिनिधींची बॅँक लवकरच नियुक्ती करणार असल्याचे उतेकर यावेळी म्हणाले.
मोफत सोयाबीन बियाणे; डीपीसीचा प्रस्ताव
By admin | Updated: May 10, 2015 23:59 IST