शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

चार हजार किलोमीटर प्रवास मोफत निव्वळ अफवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 18:07 IST

सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे.

ठळक मुद्देसप्तशृंगगड : नागरीकांनी विश्वास न ठेवण्याचे एस.टी. महामंडळाचे आवाहन

सप्तशृंगगड : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) याच्या वतीने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी मोफत प्रवास असा मोबाईलवर फेक मेसेज येत असल्याने लोकांची, विशेषत: जेठ्य नागरीकांची खिल्ली उडविली जात आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून जेष्ठ नागरीकांसाठी स्मार्ट कार्ड योजना सूरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत चारहजार किलो मीटरचा एसटी प्रवास मोफत करता येणार आहे. त्या करीता महामंडळाकडून स्मार्ट कार्ड प्राप्त करणे आवश्यक आहे. या योजनेसाठी आधार कार्ड, मतदान कार्ड किंवा मतदान स्लिप आणि ५५ रूपये घेऊन जवळच्या एसटी डेपोत जावे लागेल. वेळ सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत आहे, काही भागात ही वेळ वेगळी असू शकेल. असा मेसेज गेल्या पधंरा दिवसांपासून व्हाटस अ‍ॅपद्वारे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्यामुळे ५५ रूपांयात जेष्ठ नागरीकांसाठी चार हजार किलो मीटरचा एसटी बस प्रवास मोफत मिळणार असल्याकारणाने सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे जेष्ठ नागरीकांमध्ये चर्चेचा विषय होत आहे. परंतू काहींनी या मोफत प्रवासाविषयी भ्रमनध्वनीवरून कळवण डेपो मॅनेजर यांच्याशी सपंर्क साधला असता, ही सर्व अफवा असून आम्ही या विषयी मुंबई सेंट्रल डेपोशी या बाबत विचारणा केली असता आम्ही अशी कूठलीही योजना काढली नसून निव्वळ सोशल मिडीयावर ही अफवा पसरवली जात असल्याची कबूली डेपो मॅनेजर यांनी सांगितले. त्यामुळे या अफवावंर नागरीकांनी व प्रवाशांनी विश्वास ठेऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.(फोटो २९ एसटी)