शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
2
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
3
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
4
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
5
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो समोर आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार
6
मुख्याध्यापक वर्गातच झिंगून वर्गातच झोपले; खिशात देशी दारूची आणखी एक बाटली भरलेली... 
7
आयुष्याचा शेवट ठरला Live स्टंट...फिल्म शुटींगवेळी स्टंटमॅनचा जागीच मृत्यू; धक्कादायक व्हिडिओ समोर
8
Share Market: सेन्सेक्स २०० अंकांनी आपटला; निफ्टीमध्येही घसरण, अनेक दिग्गज शेअर्सचं लोटांगण
9
पतीला घटस्फोट देणाऱ्या सायना नेहवालकडे किती संपत्ती आहे? आकडा ऐकून थक्क व्हाल!
10
पैसे बुडणार नाहीत, तर वाढतील; ‘हे’ आहेत गुंतवणूकीचे सुरक्षित पर्याय, गुंतवू शकता तुम्ही पैसा
11
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
12
पती-पत्नी असल्याचं सांगून हॉटेलमध्ये रूम बुक केली, आत जाताच तरुणाने तरुणीवर गोळी झाडली अन्... 
13
शासकीय सेवेतील तब्बल तीन लाख पदे रिक्त !, ५,२८९ कर्मचारी नजीकच्या काळात सेवानिवृत्त होणार
14
कारमध्ये शिवसेनेचा झेंडा, एक्सप्रेस वेवर रॅश ड्रायव्हिंग; आस्ताद काळे भडकला, म्हणाला- "माझ्या गाडीला कट मारुन..."
15
आधी हातोड्याने पतीवर वार केले, मग धारदार शस्त्र वापरून संपवून टाकलं! पत्नीचा क्रूरपणा ऐकून हादरून जाल
16
लठ्ठपणाविरोधात सरकार आखतंय नवा प्लॅन; खाद्यप्रेमींसाठी IMP बातमी, समोसा, जिलेबी खाताय तर...
17
'जर तुम्ही रशियाकडे...', उत्तर कोरियाच्या किम जोंग यांचा अमेरिका, जपानला इशारा
18
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
19
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
20
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?

आहुर्ली परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार, नागरिकांमध्ये दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 20:50 IST

आहुर्ली : परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा मुक्तसंचार सुरू झाला असून, अनेकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, रात्रीचे बाहेर फिरणे शेतकऱ्यांना भितीदायक झाले असून वनविभागाचे वतीने गस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.

ठळक मुद्देनागरिकांवर दहशतीचे सावट पसरले

आहुर्ली : परिसरात बिबट्याचा पुन्हा एकदा मुक्तसंचार सुरू झाला असून, अनेकांना या बिबट्याने दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली आहे. दरम्यान, रात्रीचे बाहेर फिरणे शेतकऱ्यांना भितीदायक झाले असून वनविभागाचे वतीने गस्तीची मागणी नागरिकांनी केली आहे.इगतपुरी तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेल्या पिंपळगाव मोर, टाकेद परिसरात बिबट्याचा धुमाकूळ ताजा असतानाच आहुर्ली परिसरातील बिबट्याच्या मुक्त वावराच्या घटनेने नागरिकांवर दहशतीचे सावट पसरले आहे.पिंपळगाव मोर परिसरात या बिबट्याने लहान मुलीचा बळी घेतल्याच्या घटनेमुळे नागरिक ही घाबरले असून, शेतीला पाणी देणे वैगेरेची कामे रात्री वीज येत असल्याने नाईलाजाने करावी? लागतात, ती आता कामे कशी करावी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.साधारणतः चार-सहा महिन्यांपूर्वी ही सांजेगाव परिसरात बिबट्याच्या मुक्तसंचाराने धूम माजवली होती. त्यावेळी नागरिक व प्रसारमाध्यमांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावून सापळा रचण्यात आला होता. यात एक बिबट्या ही जेरबंद झाला होता.दरम्यान, नागरिक याप्रकारानंतर मोकळा श्वास घेत नाही तोच पुन्हा एकदा बिबट्याचे दर्शन व मुक्तसंचार यामुळे नागरिक पुन्हा दहशतीच्या सावटाखाली आले आहेत.दरम्यान, पिंपळगाव मोरप्रमाणे एखादी दुर्घटना घडण्याअगोदरच वनविभागाच्या वतीने दक्षता घेण्यात यावी, गस्तिपथकाचे माध्यमातून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.बहुतांश शेतकऱ्यांची वस्ती ही शेतातील शिवारात लांब लांब अंतरावर व एकटी दुकटी आहे. आहुर्ली परिसर व परिसरातील अनेक गावे ही धरणाच्या काठावर वसलेली असून वस्ती ही धरणाच्या जवळपास आहे. पाणी पिण्यासाठी बिबट्या नेहमीच या धरणावर ये-जा करत असल्याने त्याच्या मार्गावरील शेतकऱ्यांची वस्ती असणारे नागरिक धास्तावले आहेत.बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांना मळ्याच्या वस्तीत जीव मुठीत धरून रहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी पाणी भरणे आदी कामे नाईलाजाने करावी लागत आहे.- दत्तू पा. गायकर, नागरिक, आहुर्ली

टॅग्स :forestजंगलleopardबिबट्या