शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
3
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
4
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
5
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
6
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
7
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
8
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
9
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
10
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
11
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
12
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
13
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
14
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
15
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
16
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
17
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
18
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
19
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
20
नवी मुंबई विमानतळ, भुयारी मेट्रोचे पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण

1.85 लाख रुग्णांवर मोफत औषधोपचार

By admin | Updated: September 22, 2015 23:34 IST

पालिकेची वैद्यकीय सेवा : ९७ गंभीर रुग्णांवर उपचार; ३९२ डॉक्टरांनी दिले योगदान; स्वाइन फ्ल्यूसाठीही विशेष कक्ष

नाशिक : सिंहस्थ कुंभपर्वकाळात दोन महिन्यांत तीनही शाही पर्वणींसह महापालिकेने पुरविलेल्या वैद्यकीय सेवेचा १ लाख ८५ हजार रुग्णांनी लाभ घेतला तर ९७ गंभीर रुग्णांना तातडीने वैद्यकीय सुविधा पुरवत महापालिकेच्याच इंदिरा गांधी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. विशेष म्हणजे महापालिकेने संपूर्ण पर्वकाळात मोफत औषधोपचार केल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांनी दिली. महापालिकेमार्फत १३ जुलै ते १९ सप्टेंबर या कालावधीत कुंभमेळ्यानिमित्त शहरात दाखल झालेल्या भाविकांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यासाठी साधुग्राममध्ये १०० खाटांचे स्वतंत्र रुग्णालय कार्यान्वित करण्यात आले होते. तर महापालिकेचे इंदिरा गांधी रुग्णालय, कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय याठिकाणी उपचाराची व्यवस्था करण्यात आली होती. या व्यतिरिक्त २६ ठिकाणी तात्पुरते दवाखाने, पाच ठिकाणी विविध इमारतींमध्ये तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने आणि ६ ठिकाणी मोबाईल डिस्पेन्सरीही कार्यरत ठेवण्यात आल्या होत्या. संपूर्ण पर्वकाळात महापालिकेने पुरविलेल्या वैद्यकीय सेवेचा १ लाख ८५ हजार ४७१ रुग्णांनी लाभ घेतला. याशिवाय १२५३ जणांना आंतर रुग्णसेवा पुरविण्यात आली तर ९७ गंभीर रुग्ण इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यातील २० अतिगंभीर रुग्णांना जीवनदान देण्यात वैद्यकीय विभागाला यश आले. इंदिरा गांधी रुग्णालयात स्वाइन फ्लूसाठीही १६ बेडचा विशेष कक्ष तयार करण्यात आला होता. ही सर्व वैद्यकीय सेवा पुरवण्यात ३९२ शासकीय व खासगी तज्ज्ञ डॉक्टर्स, ३२६ परिचारिका व १९३ फार्मासिस्ट यांचा सहभाग होता. रुग्णांना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेमार्फत ११८ रुग्णवाहिका महत्त्वाच्या ठिकाणी तैनात ठेवण्यात आल्या होत्या. १०८ नंबरच्या रुग्णवाहिकांमार्फत ९१२ रुग्णांना तत्काळ संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात येऊन त्यांच्यावर उपचार करण्यात आले. महापालिकेने रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी व्हेन्टिलेटर, मॉनिटर, डॉपलर, एक्स-रे मशीन यासाठी अत्याधुनिक उपकरणे खरेदी केली होती. विशेष म्हणजे या रुग्णांवर मोफत उपचार केले.