शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 13:20 IST

नाशिक, दि.31- महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. तसंच या भागातील एका फार्महाऊसच्या ...

ठळक मुद्दे महादेवपूर परिसरात एका फार्महाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार कैद झाला आहे.. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतो आहे.

नाशिक, दि.31- महादेवपूर परिसरात बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली. तसंच या भागातील एका फार्महाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा संचारही कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतो. डावा कालव्याचा मळे परिसर सध्या बिबट्याच्या दहशतीखाली आला असून, शेतकरीवर्गावर भीतीचे सावट पसरले आहे. गोदाकाठालगत बिबट्याचा वावर नवीन नसला तरी थेट मानवी वस्तीजवळ बिबट्या येणे हे मात्र धोक्याचे मानले जात आहे. गंगापूररोड-गिरणारे रस्त्यावरील महादेवपूर ते मखमलाबादजवळील गंगावाडी परिसर आणि पुढे थेट मेरीपर्यंत बिबट्याचा धुमाकूळ वाढत आहे. वन्यजीव असलेला मार्जार कुळातील बिबट्याची अन्नसाखळी संपुष्टात आल्यामुळे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत संघर्ष करीत आहेत. त्याचा हा संघर्ष आता महादेवपूरपासून तर थेट मेरीपर्यंत डाव्या कालव्यालगतही दिसू लागला आहे. या भागातील शेतकरी यामुळे चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या पशुधन तसेच मजुरांवर हल्ला करण्याची भीती त्यांच्याकडून व्यक्त केली जात आहे. एकूणच बिबट्याचा वाढता संचार धोक्याचा मानला जात आहे. येथील मळे परिसरात शेतकरी व त्यांचे शेतमजुरांची घरे आहेत. महादेवपूरजवळील आभाळवाडी, दरी-मातोरी, मुंगसरा, मनोली, चांदशी, गंधारवाडी, मखमलाबाद शिवारापासून पुढे मेरीपर्यंत बिबट्याचा संचार वाढला आहे.  गंधारवाडी, मखमलाबाद, दुगाव-मुंगसरा परिसर, मनोली परिसर, जलालपूर शिवारात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करून पिंजरे बसविले आहेत.