शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

पाच दत्तक गावांची मोफत आरोग्य सेवा

By admin | Updated: July 19, 2016 00:49 IST

सामाजिक बांधिलकी : युनानी मेडिकल कॉलेज, अस्सायर रुग्णालयाचा उपक्रम

 राजीव वडगे संगमेश्वरमालेगाव-मनमाड चौफुलीनजीकच्या मोहंमदिया तिब्बिया युनानी मेडिकल कॉलेज व अस्सायर रुग्णालय (मन्सुरा)ने विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण देत असतानाच मालेगाव तालुक्यातील पाच गावे दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.१९८१ पासून युनानी पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण या महाविद्यालयातून दिले जात आहे. शेकडो विद्यार्थी शिक्षण घेऊन डॉक्टर झाले आहेत. पदवी व पदव्युत्तर शिक्षणाची सोय असणारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अनुदानित हे महाविद्यालय आहे. दत्तक घेतलेल्या या गावांचे सर्वेक्षण करण्यात आले. येथील ग्रामस्थांमध्ये असलेले आजार, रोग, शिक्षण याची माहिती संकलित करण्यात आली. रक्तगट तपासणी, हिमोग्लोबीनची तपासणी करण्यात आली. त्यांची दर आठवड्याला आरोग्य तपासणी करण्यात येऊन उपचार करण्यात येतात. सदर गावांतील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी होते. एक पुरुष डॉक्टर, एक महिला डॉक्टर, कंम्पाउंडर व दोन प्रशिक्षणार्थी विद्यार्थी डॉक्टर आदिचे पथक प्रत्येक गावात दर आठवड्याला जाऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याबरोबरच आरोग्यविषयक जनजागृती करतात. शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना स्वयंस्वच्छतेचे धडे दिले जातात. महिलांना स्त्री डॉक्टरांमार्फत आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेची माहिती दिली जात आहे. या उपक्रमांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिकाही आता मदत करु लागले आहेत.हर्निया, अ‍ॅपेंडिक्स, मोतीबिंदूच्या अनेक रुग्णांना महाविद्यालयाच्या रुग्णालयात आणून सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जात आहे. शिवाय रक्त, लघवी तपासणी, इसीजी, एक्स-रे, सोनोग्राफी आदि तपासण्याही सवलतीच्या दरात होत असल्याने रुग्णांना मोठा आर्थिक दिलासा मिळत आहे. स्त्रियांच्या स्तनांची कॅन्सर तपासणी करणारे, मॅमोग्राफी करणारी अद्ययावत यंत्रसामग्री मालेगाव परिसरात फक्त याच रुग्णालयातच उपलब्ध आहे. मन्सुरा संस्थेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अ‍ॅड. इस्माईल रोशनअली, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजहर हसन, कॉलेजच्या मेडिकल कॅम्प कमिटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल सलाम आदिंचा उपक्रम राबविण्यात पुढाकार आहे.