मालेगाव : शहरात स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखरप्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजनेतील लाभार्थी करिता अतिरिक्त ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, अडचणी असल्यास धान्य वितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार चंद्रजित राजपूत यांनी केले आहे. कोरोना संकटामुळे लॉकडाउन झालेल्या जनतेला राज्यातील सरकारने दिलासा देण्याच प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडी सरकारने तीन महिन्यांचे अन्नधान्य रेशन दुकानावर उपलब्ध करून देण्याची सोय केली आहे. तसेच केंद्र सरकारकडून प्रत्येक पात्र लाभार्थीस ५ किलो तांदूळ देण्यात येणार असून, ते धान्य अजून उपलब्ध झालेले नाही. लवकरच ते मालेगाव शहर व तालुक्यातील नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केंद्राच्या वतीने देण्यात येणारे ५ किलो तांदूळ आणि आताचे स्वस्त धान्य दुकानावर दिले जाणारे धान्य याचे वाटप हे वेगवेगळे होणार आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली असून, या संचारबंदीच्या काळात गरीब नागरिकांची उपासमार होऊ नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. गरीब आणि गरजू लोकांना लॉकडाउनमध्ये अन्न धान्याचा तुटवडा भासू नये म्हणून रेशन दुकानावर दर महिन्यांचे रेशन दिले जाणार आहे. तसेच नागरिकांनी स्वस्त धान्य दुकानावर गर्दी करू नये सोशल डिस्टेन्सचे पालन करावे असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. त्यासाठी रेशन दुकाने हे दररोज चालू ठेवण्याचे आदेश तहसीलदार राजपूत यांच्याकडून देण्यात आले आहेत. शिवाय पात्र लाभार्थी नसले किंवा रेशनकार्ड नसले तरी लॉकडाउनमध्ये अन्नधान्याशिवाय उपासमारीची वेळ कुठल्याही कुटुंबावर येऊ नये म्हणून सामाजिक संस्थांना मदतीचे आवाहन उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडून करण्यात आले आहे. रेशन दुकानावरील लाभार्थी यादी सामाजिक संस्थांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. शासकीय लाभार्थीव्यतिरिक्त उरलेले धान्य गरजू लोकांपर्यंत पोहोचवा, असे आवाहनदेखील सामाजिक संस्थांना करण्यात आले आहे.शासनाने तीन महिन्याचे धान्य एकत्र देण्याचा निर्णय घेतला होता; पण त्यात काही अडचणी येत असल्याने ते धान्य वाटप दर महिन्याला करण्यात येणार आहे. नागरिकांनी गोंधळून जाण्याचे काही कारण नाही. सध्या स्वस्त धान्य दुकानावर दिले जाणारे धान्य हे अंत्योदयधारकांना ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिएकास कुटुंबशिधापत्रिकाधारक मंजूर सदस्य ( युनिट ) साठी प्रतिसदस्य ३ किलो गहू तर २ किलो तांदूळ असे युनिटमधील सदस्यांना प्रतिगहू २ तर तांदूळ ३ रुपयाच्या दराने मिळेल. पूर्वी असलेल्या मान्य यादीनुसार सर्वांना दर महिन्याला हे धान्य वाटप होणार असून चढ्या दराने अथवा दुकानदाराकडून काही गैरप्रकार दिसून आल्यास संबंधित दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल.मालेगाव धान्य वितरण अधिकारी शहर यांच्या कक्षेत एकूण अंत्योदयचे -१४८०० , प्राधान्य सदस्य संख्या - १,५०,००० , तर मालेगाव तालुक्यातील अंत्योदयचे -११८०० , प्राधान्य सदस्य संख्या - २,६३,२७० असून दोघे मिळून ३२४ स्वस्त धान्य दुकाने आहेत. दर महिन्यात ज्या पद्धतीने वाटप करण्यात येत होते तसेच वाटप करण्यात येणार असून, केंद्र सरकारकडून अतिरिक्त ५ किलो तांदूळ वाटप करण्यात येणार असून, ते नि:शुल्क असणार आहे. कोणीहीया ५ किलो धान्याचे पैसे घेतल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी दक्षता समिती असून, त्याद्वारे त्यांचेवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
मालेगावी तहसीलतर्फे मोफत धान्य वाटप नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 22:28 IST
स्वस्त धान्य दुकानात अंत्योदयसाठी ३५ किलो धान्य आणि १ किलो साखर प्रतिशिधापत्रिका तर प्राधान्य कुटुंबधारकाला मंजूर सदस्य (युनिट)नुसार प्रतिसदस्य गहू ३ किलो प्रतिकिलो २ रुपये, तांदूळ २ किलो हे प्रतिकिलो ३ रुपये दराने केंद्र सरकार कडून वरील दोन्ही योजनेतील लाभार्थी करिता अतिरिक्त ५ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे.
मालेगावी तहसीलतर्फे मोफत धान्य वाटप नियोजन
ठळक मुद्देलॉकडाउनमध्ये दिलासा : अतिरिक्त पाच किलो तांदूळ मिळणार