शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिबंधित क्षेत्रात मुक्तसंचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:18 IST

पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिवसभर मुक्तसंचार असल्याचे दिसून येत आहे.

पंचवटी : परिसरातील कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या पेठरोडवरील फुलेनगर परिसरात प्रशासनाने केवळ पेठरोड पाण्याचा पाट ते शनिमंदिर रस्त्यावर लोखंडी बॅरिकेडिंग टाकून रस्त्यावरची सर्व वाहतूक बंद केली आहे. तरीही या मुख्य रस्त्यावर पायी पायी फिरणाऱ्या नागरिकांचा दिवसभर मुक्तसंचार असल्याचे दिसून येत आहे. कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात योग्य खबरदारी घ्यावी, असे एकीकडे शासनाने सुचविलेले असले तरी दुसरीकडे मात्र कोरोना हॉटस्पॉट ठरल्याने प्रतिबंधित भागात नागरिकांकडून नियमांची उघडपणे पायमल्ली केली जात असल्याचे चित्र दिसत आहे.नागरिकांची दिवसभर वर्दळ प्रतिबंधित क्षेत्रात विविध दुकाने सुरू असून, नागरिकांची दिवसभर वर्दळ असते दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. परिसरातील भराडवस्ती, गौडवाडी, मायको दवाखाना परिसर, गजानन चौक, राहुलवाडी, सम्राटनगर, वैशालीनगर, महाराणा प्रताप चौक, शेषराव महाराज चौक, मनपा शाळा परिसर या भागात लहान मुले, तसेच नागरिक आणि युवकांचे टोळके कायम उभे राहत असल्याने कोरोना हॉटस्पॉट भागात बंदी नावाला असली तरी नागरिकांचा संचार कायम आहे.----------------लोखंडी पत्रे आणि लाकडांच्या सहाय्याने रस्ते केले बंदप्रतिबंधित क्षेत्रात अंतर्गत रस्त्यावर नागरिकांसह वाहनांची सर्रासपणे ये-जा असल्याचे चित्र फुलेनगर कोरोना हॉटस्पॉट भागात दैनंदिन दिसून येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी झोपडपट्टी पंचवटी पेठरोडला आहे. काही दिवसांपूर्वी या भागात कोरोनाने शिरकाव केला आणि बघताबघता एका पाठोपाठ एक रु ग्ण आढळून आल्याने फुलेनगर भागातील कोरोना परिस्थिती आटोक्यात रहावी यासाठी मनपा आयुक्तांनी पाहणी केली होती. त्यानंतर कोरोना हॉटस्पॉट असल्याने सदर परिसरात प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात येऊन ज्या ज्या भागात रु ग्ण आढळले त्या भागात फलक लावण्यात येऊन तेथील काही रस्ते लाकडी बांबूच्या सहाय्याने बंद करण्यात आले मात्र नागरिकांनी अडथळ्याची शर्यत पार करत कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातून मार्ग काढत इच्छितस्थळी जाणे सुरू ठेवले आहे.---------------प्रशासनाकडून डोळेझाककोरोना प्रतिबंधित क्षेत्र असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घेणे गरजेचे होत. मात्र प्रशासनाकडून डोळेझाक केल्याचे दिसून येते. दिंडोरीरोडला मायको दवाखाना असून, सकाळी रु ग्णालयात तपासणीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. याशिवाय या भागात राहणारे नागरिक कोणत्याही प्रकारचे फिजिकल डिस्टन्सिंग पाळत नाही. तोंडाला मास्क लावत नसल्याने दिसून आले, तर मुख्य रस्ते बंद असल्याने अंतर्गत रस्त्याने व पाटकिनार किंवा दत्तनगर रस्त्याने दुचाकी वाहतूक सुरूच आहे.

टॅग्स :Nashikनाशिक