शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

बनावट मृत्यूपत्राद्वारे फसवणूक; संशयितांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2015 22:57 IST

बनावट मृत्यूपत्राद्वारे फसवणूक; संशयितांवर गुन्हा

नाशिक : स्थावर मालमत्तेचे बनावट कागदपत्र तसेच मालकाचे खोटी सही, अंगठा घेऊन बनावट मृत्यूपत्र तयार करून फसवणूक करणाऱ्या पाच संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ या संशयितांमध्ये एका बांधकाम व्यवसायिकाचाही समावेश आहे़सरला पंडित मौले (४५, गणेशनगर, खंडेराव मंदिरामागे, ओझर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडील मुरलीधर नारायण काठे यांच्या मृत्यूनंतर वारस हक्काप्रमाणे त्यांचे व भाऊ-बहिणींचे नाव लागले होते़ मात्र भाऊ यादव मुरलीधर काठे, प्रकाश मुरलीधर काठे यांनी बनावट कागदपत्र व वडिलांची खोटी सही व अंगठा असलेले मृत्यूपत्र तयार केले़ तसेच ही मिळकत संशयित पुंडलिक रामचंद्र बनकर, दत्तू मुरलीधर मोरे, बांधकाम व्यावसायिक रवि महाजन व डॉक्टर (नाव, पत्ता माहित नाही) यांच्या संगनमताने बेकायदेशीरपणे हडप करण्यासाठी महसुली दप्तरातील नाव कमी करून फसवणूक केली़याबाबत सरला मौले यांनी न्यायालयात धाव घेतली़ अ‍ॅड़ सचिन बच्छाव व अ‍ॅड़ शशिकांत गायकवाड यांनी मौले यांची न्यायालयात बाजू मांडली असता न्यायाधीश कोळपकर यांनी सरकारवाडा पोलिसांनी पाच संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले़ दरम्यान, संबंधित जागेवर बांधकाम व्यवसायिक रवि रघुनाथ महाजन यांनी बेकायदेशीरपणे आम्रपाली टॉवरची उभारणी करून कोट्यवधींची रुपयांची अफरातफर व वारसांची फसवणूक केल्याचेही मौले यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे़ (प्रतिनिधी)