नाशिक : शहरात दुचाकी चोरीपाठोपाठ चारचाकी चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या आहेत़ पहिल्या घटनेत शब्बीर मादीर कुरेशी (रा. वडाळारोड) यांची ३ लाख रुपये किमतीची एमएच १५ बीएक्स ३४६१ क्र मांकाची ह्युडांई कार चोरट्यांनी घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. तर दुसऱ्या घटनेत पंढरीनाथ राजधर पाटील (रा. सावित्री अपा, जेहान सर्कल, गंगापूर रोड) यांची एमएच १५ सीएम ३७१० क्र मांकाची १ लाख ५० हजार रूपये किमतीची मारुती इको फाईव्हस्टार ही कार इंदिरानगर परिसरातील हॉटेल द पाम समोरून शुक्र वारी चोरीला गेली. याप्रकरणी इंदिरानगर व भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)
दुचाकीपाठोपाठ चारचाकीही चोरीस
By admin | Updated: November 30, 2014 00:28 IST