शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात चौघा गणेशभक्तांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 00:07 IST

नाशिक शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.

नाशिक शहर व तालुक्यात विविध ठिकाणी श्री गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघा युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली़ विसर्जनप्रसंगी बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये जुने नाशिक, चेहेडी, श्रमिकनगर व मुंगसरा येथील युवकांचा समावेश आहे़ या घटनेमुळे गणेश विसर्जनाला गालबोट लागले आहे.सून, या प्रकरणी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़गणेश विसर्जनासाठी गंगापूर धरणावर गेलेला योगेश राम चौधरी (१९, रा़ वृंदावन गार्डन, गणेश चौक, श्रमिकनगर, सातपूर, नाशिक) या युवकाचा गंगापूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़ आपल्या मित्रांसह योगेश हा आपल्या मित्रांसमवेत गणेश विसर्जनासाठी गेल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली़ याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ दुसरी घटना चेहेडी पंपिंग बंधारा येथे घडली़ किशोर कैलास सोनार (२४, रा़ शबनकर मळा, चेहेडी शिव, सिन्नर फाटा, नाशिकरोड) हा युवक दुपारच्या सुमारास गणेश विसर्जनासाठी चेहेडी पंपिंग बंधारा येथे गेला होता़ या ठिकाणी सेल्फी काढत असताना त्याचा तोल जाऊन तो बंधाºयात पडला़ त्यास नागरिकांनी तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़तिसरी घटना पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिराजवळील गोदावरी नदीपात्रात घडली़ जुने नाशिकमधील नानावलीतील संभाजी चौकातील रहिवासी नारायण राजेंद्र सूर्यवंशी (१७) हा मुलगा सायंकाळी गणेश विसर्जनासाठी गेला होता़ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गणेश विसर्जन करीत असताना तो पाण्यात बुडाला़ त्यास नागरिकांनी तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाºयांनी तपासून मयत घोषित केले़ या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ गणेश विसर्जनासाठी गेलेला अठरा वर्षीय युवकाचा बुडून मृत्यू झाल्याची चौथी घटना मुंगसरा गावाजवळ सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली़ गणेश राजाराम मराठे (१८, रा़ मुंगसरा, ता़ जि़ नाशिक) हा युवक घरगुती गणेश विसर्जनासाठी गावाजवळील डोहाजवळ गेला होता़ यावेळी त्याचा तोल जाऊन तो पाण्यात पडला व बुडून मृत्यू झाला़ या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़