शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

मार्चमध्येच ओलांडली चाळीशी

By admin | Updated: March 28, 2017 00:33 IST

नाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली

मार्चमध्येच ओलांडली चाळीशीनाशिक : शहराच्या कमाल तपमानात सातत्याने वाढ होत असून, तपमानाचा पारा चाळीशीच्या पुढे सरकू लागल्याने नाशिककरांना उन्हाचा तीव्र चटका जाणवत आहे. सोमवारी तपमानाने चाळीशी ओलांडली असून, ४०.३ इतक्या कमाल तपमानाची नोंद झाली. अजून दोन दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हंगामातील सर्वाधिक कमाल तपमान रविवारी ४०.१ अंश इतके नोंदविले गेले होते. त्यानंतर तपमानाचा पारा पुन्हा खाली घसरेल असे वाटत असताना सोमवारीही तपमानाचा पारा अधिकच चढला. तपमानाने चाळीशी ओलांडली असून, ४०.३ इतका उच्चांक दहा वर्षांत प्रथमच मार्चमध्ये झाल्याचे हवामान खात्याकडील आकडेवारीवरून स्पष्ट होते. वाढत्या तपमानामुळे नागरिकांना तीव्र उन्हाचा चटका बसत असून, दिवसेंदिवस वाढणाऱ्या तपमानामुळे थंड हवेचे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या नाशिकमध्येही नागरिकांना उष्म्याचा त्रास सहन करावा लागत आहे. बुधवारपर्यंत तपमानाचा पारा ३८ अंशांवर स्थिरावत होता; मात्र शुक्रवारपासून तपमानाचा पारा अधिकच चढू लागला असून, चाळीशी ओलांडली आहे. मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र उन्हाळा नाशिककरांना यंदा अनुभवयास येत आहे. गेल्या वर्षी २५ मार्च रोजी ३९.७ इतक्या तपमानाची नोंद करण्यात आली होती. ही नोंद मार्च महिन्यामधील उच्चांक ठरली होती. मार्च महिन्यात गेल्या वर्षी ३९.७ अंशांच्या पुढे कमाल तपमानाचा पारा सरकला नव्हता, मात्र यावर्षी मार्च महिन्यातच कमाल तपमानाने चाळीशी ओलांडल्याने नागरिकांना तीव्र उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहे. दहा वर्षांमध्ये यावर्षी प्रथमच मार्च महिन्यात शहराचे तपमान चाळीशीपर्यंत गेले आहे.तपमानाच्या चाळीशीचा आढावावर्ष (महिना) कमाल तपमान (अंशामध्ये)१६ एप्रिल २०१०४२.०२७ एप्रिल २०११४०.४८ एप्रिल २०१२४०.०१ मे २०१३ ४०.६७ मे २०१४४०.०२० एप्रिल २०१५४०.६१८ मे २०१६ ४१.०१९ एप्रिल २०१६४१.०२७ मार्च २०१७४०.३