शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

चिखलीकरांची चौदा वर्षांत चौदा कोटींची माया

By admin | Updated: November 26, 2015 23:36 IST

एसीबीची चौकशी : दोन हजार पानी दोषारोपपत्र

नाशिक : रस्त्याच्या कामाचा धनादेश देण्यासाठी ठेकेदाराकडून २२ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश मधुकर चिखलीकर यांनी चौदा वर्षांच्या सेवेत सुमारे १४ कोटींची माया जमविल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे़ गुरुवारी (दि़२६) न्यायाधीश एऩ के. ब्रह्मे यांच्या न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चिखलीकरांसह त्यांची पत्नी व खासगी व्यक्तीविरोधात दोन हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजूर केलेल्या रायते ते काकडवळण या रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण केले होते़ या कामाचा ३ लाख ६९ हजार रुपयांचा धनादेश देण्यासाठी मंजूर बिलाच्या ६ टक्केप्रमाणे २२ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती़ लाचेची ही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात ३० एप्रिल २०१३ रोजी त्र्यंबकेश्वर उपविभागाचे शाखा अभियंता जगदीश मगन वाघ यांच्यामार्फत घेतली असताना रंगेहाथ पकडण्यात आले होते तसेच चिखलीकर व वाघ या दोघांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.सतीश चिखलीकर यांचे शासकीय निवासस्थान, त्यांच्या पत्नी स्वाती चिखलीकर यांच्या नावे असलेल्या विविध बँकांमधील लॉकरमध्ये रोख रक्कम, सोने अशी एकूण १४ कोटी ६६ लाख १७ हजार ६४६ रुपयांची स्थावर व जंगम मालमत्ता मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे़ कार्यकारी अभियंता सतीश चिखलीकर व त्यांची पत्नी स्वाती चिखलीकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विशेष न्यायालयात दोन हजार पानी दोषारोपपत्र दाखल केले आहे़(प्रतिनिधी)