शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षांतील तापमानाचा उच्चांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 00:47 IST

शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही;

नाशिक : शहराचे वातावरण शुक्रवारी कमालीचे उष्ण झाले होते. मागील चार वर्षांच्या हंगामाच्या उच्चांकी तापमानाची नोंद शुक्रवारी (दि.२६) मागे पडली. २०१६पासून अद्याप तापमानाचा पारा ४१ अंशांपार सरकल्याची नोंद नाही; मात्र यावर्षी एप्रिल महिनाअखेर ४१.७ अंश इतके तापमान नोंदविले गेल्यामुळे नाशिक करांच्या जिवाची काहिली झाली. शहरात उन्हाचा कहर नाशिककरांनी अनुभवला. मालेगावमध्ये ४२.६ अंश इतके तापमान नोंदविले गेले.मागील बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहे. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीवर पोहचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काही अंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारी अचानकपणे वातावरणात उष्मा वाढला व वाऱ्याची गती मंदावल्याने मागील चार वर्षांपेक्षा अधिक ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमानाचा पारा पोहचला. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहरातील मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर फारशी वर्दळ दिसून आली नाही.  सूर्यास्तानंतरही नाशिककरांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. कारण कमाल तापमानासोबत किमान तापमानाचा पारादेखील मागील चार वर्षांपासून चढता आहे. किमान तापमान शुक्रवारी २३.२ अंश इतके नोंदविले गेले.एप्रिलअखेर प्रखर उन्हाची तीव्रता नागरिक अनुभवत आहेत. १३ एप्रिल रोजी कमाल तापमान ३९.७ अंशांपर्यंत गेले होते. आठवडाभरानंतर तापमानाने चाळिशी गाठली आहे. २८ मार्च रोजी या हंगामातील सर्वाधिक उच्चांकी ४०.४ इतके कमाल तापमान नोंदविले गेले; मात्र ही नोंद शुक्रवारी मागे पडली. ४१.७ अंशांपर्यंत कमाल तापमान पोहचल्याने नाशिककर उन्हाच्या चटक्याने अक्षरश: भाजून निघाले.आठवड्याचे कमाल तापमान१९ एप्रिल : ३७.३२० एप्रिल : ३८.०२१ एप्रिल : ३७.७२२ एप्रिल : ३८.२२३ एप्रिल : ४०.१२४ एप्रिल : ४०.९२५ एप्रिल : ४०.५

टॅग्स :TemperatureतापमानEnchroachmentअतिक्रमण