शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात एकाच दिवसात चौघांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:15 IST

जेलरोडला राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरातील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सचिन गणेश पवार (वय ३५) असे ...

जेलरोडला राजराजेश्वरी मंगल कार्यालय परिसरातील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. सचिन गणेश पवार (वय ३५) असे आत्महत्या केलेल्या मृताचे नाव आहे. मृत गणेश व्यायाम शाळेजवळील गोविद जाधव यांच्या घरात राहायला असून मंगळवारी (दि. २७) रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने घरातील माळ्याला टॉवेल बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी रवींद्र गुलाब ठाकूर यांच्या तक्रारीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दुसरा प्रकार पंचवटीतील धात्रक फाटा परिसरातील बलरामनगरला उघडकीस आला. वैष्णवी नितीन कर्पे (वय २३, स्वर्णप्रभा बंगला) यांनी बुधवारी (दि. २८) दुपारी राहत्या घरी हॉलमध्ये लोखंडी जिन्याच्या रॅलिंगला पिवळ्या रंगाच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तिसऱ्या घटनेत रत्ना नंदू सुर्वे (वय ३५, राजहंस अपार्टमेंट, धात्रक फाटा) या महिलेने बुधवार (दि. २८) अडीचच्या सुमारास राहत्या घरातील हॉलमध्ये छताच्या पंख्याला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चौथी घटना सिडको परिसरात उघडकीस आली. नीलेश सुरेश वाघ (वय ३५, रायगड चौक सिडको) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. बुधवारी (दि. २८) सायंकाळी साडेसातच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने घराच्या छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.