शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

चार धरणांतून विसर्ग : गोदेला पूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:42 IST

गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे.

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावल्यामुळे नद्या, नाले दुथडी भरून वाहू लागले असून, धरणक्षेत्रातही पावसाची संततधार सुरू राहिल्याने धरणांच्या साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाल्याने तसेच त्र्यंबकेश्वर येथे पाऊस सुरू असल्यामुळे खबरदारीचा  उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ३४ टक्के  साठा झाला असून, त्यातील गंगापूर, दारणा, चणकापूर, पुनंद या चार धरणांतून पाणी सोडण्यात आल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा  दिला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत नाशिक जिल्ह्णात अतिवृष्टीचा अंदाज वर्तविला आहे.  शनिवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाची तिसऱ्या दिवशीही संततधार कायम असून, रविवारी दिवसभर व रात्रीही कोसळलेल्या पावसाने जिल्ह्णातील धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यात गेल्या दोन दिवसांत विक्रमी पाऊस झाल्याने गंगापूर व दारणा धरणात ७५ टक्के जलसाठा झाला असून, भावली धरणही ८० टक्के भरले आहे. गेल्या वर्षीही जुलैच्या पहिल्या आठवड्यात धुवाधार कोसळेल्या पावसामुळे गंगापूर धरणात ७५ टक्के जलसाठा झाला होता. यंदा उशिरा पाऊस सुरू होऊनही गंगापूर धरणात ७५ टक्के साठा झाला आहे. त्र्यंबकेश्वर व इगतपुरीच्या धरण क्षेत्रात सोमवारीही पावसाची हजेरी कायम असल्यामुळे धरणाची खबरदारी म्हणून गंगापूर धरणातून सकाळी दहा वाजता ३१४४ क्यूसेक तर दारणा धरणामधून ३७२६ क्यूसेक पाणी सोडण्यात आले, त्यानंतर दुपारनंतर पुन्हा विसर्गात वाढ करण्यात आली. दारणा व गंगापूरमधून पाणी सोडल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून ७२१० क्यूसेक पाणी सोडून देण्यात आले तर चणकापूरमधून ५६७, पुनदमधून ११९८ क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.जिल्ह्णातील अन्य धरणांमध्येही पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरण समूहात ५८ टक्के साठा झाला आहे. तर पालखेड समूहात २५ टक्के, वालदेवी ४४ टक्के, कडवा ४२ टक्के, चणकापूर ४५ टक्के, हरणबारी २३ टक्के पाणी साठले आहे. जिल्ह्णातील सर्व धरणांमध्ये ३४ टक्के साठा झाला आहे. भोजापूर, नाग्यासाक्या, माणिकपुंज ही तिन्ही धरणे कोरडीठाक आहेत.सतर्कतेचा इशाराजिल्ह्णातील प्रमुख धरणांमधून पाणी सोडल्याने गोदावरी, दारणा, कादवा, आरम, गिरणा या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून, नागरिकांनी पुराचे पाणी पाहण्यासाठी गर्दी केली होती तसेच आंघोळीसाठीदेखील मुलांनी नदीत उड्या घेण्यास सुरुवात केल्याने प्रशासनाने नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. धरणक्षेत्रात सध्या पाऊस सुरू असल्याने धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे प्रसंगी धरणाच्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात येणार असल्यामुळे नदीच्या काठालगत असलेल्या रहिवाशांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :floodपूर