पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराजवळील उड्डाणपुलालगत कोटमगाव शिवारात गट क्रमांक ७४/१ मध्ये जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे व ७४/२ मध्ये शहरातील समर्थ हॉस्पिटलचे संचालक डॉ. शरद फकिरा गायकवाड यांची मिळकत आहे. संपूर्ण गटास तारेचे कुंपण आहे. या मिळकतीत योगेश रामदास कोटमे, भास्कर रामदास कोटमे, संतोष विठ्ठल कोटमे, सागर सुभाष बारगळ, सुरेश विठ्ठल कोटमे (सर्व रा. कोटमगाव ता. येवला) यांनी प्रवेश करून जलहक्क संघर्ष समितीचे भागवतराव सोनवणे यांच्या शेतात घुसून धमकी दिली व शेताची नासधूस केली. याबाबत सोनवणे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
सोनवणे यांचे फिर्यादीवरून पोलिसांनी दुसर्याच्या मालमत्तेत घुसून दंगल करणे, मालमत्तेचे नुकसान करणे, कोविड प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन याप्रकरणी योगेश रामदास कोटमे, भास्कर रामदास कोटमे, संतोष विठ्ठल कोटमे, सागर सुभाष बारगळ, सुरेश विठ्ठल कोटमे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यातील चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रक्ररणी चोरीचाही गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास हवालदार बाळासाहेब कांदळकर करीत आहेत.
इन्फो
जेसीबीने केले नुकसान
एक आरोपी कन्नड शिवारात लपून बसल्याचे कळते. यातील एक संशयित नगरपालिकेच्या जेसीबीवर ठेकेदाराकडे चालक आहे. त्याने जेसीबी रात्री-अपरात्री आणून भागवतराव सोनवणे व डॉक्टर शरद गायकवाड यांच्या शेताचे नुकसान केले. कटर मशिन तसेच वेल्डिंग मशीन आणून ता. कंपाउंडचे लोखंडी अँगल व कोटिंग केलेली महागडी तारेची जाळी चोरून नेली.