शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

नागरेसह चौघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

By admin | Updated: January 3, 2017 21:53 IST

१ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणात पोलीस कोठडीतील संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या चौघा संशयितांची

ऑनलाइन लोकमत नाशिक, दि. 3  १ कोटी ३५ लाख रुपयांच्या बनावट नोटा छपाई प्रकरणात पोलीस कोठडीतील संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील व कृष्णा रामस्वरूप अग्रवाल या चौघा संशयितांची मंगळवारी (दि़३) न्यायाधीश डी़व्ही देढीया यांनी न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ या चौघांचीही पोलीस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ दरम्यान, संशयित अग्रवालकडून पोलिसांनी संगणकाचा सीपीयु व हार्ड डीस्क जप्त केली आहे़पुणे आयकर विभागाच्या माहितीनुसार आडगाव पोलिसांनी २२ डिसेंबरला मध्यरात्री मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल जत्रासमोर तीन आलिशान कार अडवून ११ संशयितांकडून १ कोटी ३५ लाख रुपयांच्या पाचशे व एक हजार रुपयांच्या बनावट नोटा, तर १़८० लाख रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या होत्या़ पोलिसांनी संशयित नागरेच्या खुटवडनगरमधील आॅसम ब्यूटिपार्लरमधून बनावट नोटा छापण्यासाठीचे प्रिंटर, स्कॅनर, कटर मशीन, शाई, कागद जप्त करण्यात केले़ तसेच बँकेतील सुमारे ५८ लाखांची रक्कमही शोधून काढली़ पोलिसांनी अटक केलेल्या अकरा संशयितांपैकी रमेश पांगारकर, संतोष गायकवाड, डॉ़ प्रभाकर घरटे, ईश्वर परमार, नीलेश लायसे, गौतम जाधव, प्रवीण मांढरे, राकेश कारखूर यांची बारा दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर सोमवारी (दि़२) न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ तर उर्वरीत संशयित संदीप सस्ते, छबू नागरे, रामराव पाटील-चौधरी व पोलिसांना शरण आलेल्या कृष्णा अग्रवाल यांना आणखी एक दिवसांंची पोलीस कोठडी सुनावली़ या चौघांचीही कोठडीची मुदत संपल्याने त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते़ पोलिसांनी केलेल्या तपासात नागरे व पाटील हे नोटा छपाईतील प्रमुख सूत्रधार तर अग्रवाल टेक्निशियन असल्याचे समोर आले आहे़ तसेच आणखी ८० कोटी रुपयांच्या नोटा छापण्याच्याही त्यांची तयारी होती़दरम्यान, पोलिसांनी बनावट नोटांसाठीचा कागद कुठून आणला, कटर मशीनची खरेदी कोठून केली याचा तपास पूर्ण केला आहे़ तसेच येत्या चार दिवसांत या प्रकरणात आणखी मोठा खळबळजनक गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे़ या प्रकरणातील बाराही संशयितांची आता नाशिकरोड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे़(प्रतिनिधी)  अग्रवाल  हा बनावट नोटांचा टेक्निशियनपोलीस कोठडीतील संशयित कृष्णा रामस्वरूप अग्रवाल (३५, रा़ रुद्राक्ष सोसायटीच्या बाजूला, कामगारनगर, सातपूर) याच्याकडे पोलिसांनी स्वतंत्र चौकशी केली़ त्यामध्ये बनावट नोटा छपाईचे काम छबू नागरे करीत असला तरी यासाठी आवश्यक असलेले तांत्रिक सहाय्य अर्थात टेक्निकल एक्स्पर्टचे काम अग्रवालचे होते़ त्याच्याकडून पोलिसांनी नोटा स्कॅनिंग करण्यासाठी वापरलेला सीपीयु व हार्डडीस्कही जप्त करण्यात आली आहे़ तसेच अग्रवाल हा पुर्वी झेरॉक्स मशीन चालवत असल्याचेही समोर आले आहे़