शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चार चित्ररथ सहभागी : मर्दानी खेळांनी वेधले लक्ष; शहर परिसरात अनेक ठिकाणी शिवप्रेमींचा मानाचा मुजरा शिवरायांच्या जयजयकारात मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 01:19 IST

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, रथांवरील आकर्षक विद्युत रोषणाई आणि मर्दानी खेळ करीत शिवजयंती साजरी करण्यात आली.

ठळक मुद्देसायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ चित्ररथात शिवाजी महाराजांचा जीवंत देखावा

नाशिक : ढोल-ताशांचा गजर, रथांवरील आकर्षक विद्युत रोषणाई आणि मर्दानी खेळ करीत शहरातील पारंपरिक मार्गाने शिवजयंती मिरवणूक काढण्यात येऊन शहरात ठिकठिकाणी तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. भगव्या पताका आणि ध्वजांनी चौक सजविण्यात आले होते, तर ठिकठिकाणी महाराजांना मानाचा मुजरा करणारे फलक लावण्यात आले होते. सायंकाळी जुने नाशिक येथील पारंपरिक मार्गाने शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपमहापौर प्रथमेश गिते यांच्या हस्ते नारळ फोडून मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावरील चित्ररथ सजविण्यात आले होते. एका चित्ररथात शिवाजी महाराजांचा जीवंत देखावा साकारण्यात आला होता. मिरवणुकीत शहीद भगतसिंग क्रांतिदल मंडळ, हिंदू एकता आंदोलन, श्री शनैश्चर युवक समिती आणि समस्त भोई समाज यांच्या वतीने चित्ररथ काढण्यात आले.यंदा तारखेनुसार शिवजयंती जोरात साजरी झाली. त्यामुळेच की काय यंदा तिथीनुसार शिवजयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीस अवघे चार चित्ररथ सामील झाले होते. यापूर्वी तिथीनुसार साजरी होणाºया शिवजयंतीत मोठ्या प्रमाणात चित्ररथ सहभागी होत असे. परंतु, तारखेनुसार शिवजयंती साजरी करण्यास भाजपाने पुढाकार घेतला व त्याचा फटका सेनेला बसल्याची चर्चा मिरवणुकीत होती.