शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

By admin | Updated: January 21, 2017 00:14 IST

कालिदासची दुरवस्था : आयुक्तांनी घेतली गंभीर दखल

नाशिक : महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांनी महापालिकेचे वाभाडे काढल्यानंतर आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी त्याची गंभीर दखल घेत चार अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. दरम्यान, कालिदासच्या दुरुस्तीची कामे सध्या सुरू असून, दामले यांनी फेसबुकवर टाकलेली छायाचित्रे ही जुनी असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे. महाकवी कालिदास कलामंदिरातील दुरवस्थेबद्दलची काही छायाचित्रे अभिनेता प्रशांत दामले यांनी फेसबुकवर शेअर करत नाराजी व्यक्त केली होती. दामले यांच्या पोस्टवरून सोशल मीडियात असंख्य प्रतिक्रिया उमटल्या आणि अनेकांनी महापालिकेला दूषणे दिली. दरम्यान, आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दामले यांच्या या नाराजीची दखल घेत कालिदासच्या दुरवस्थेबद्दल अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे  अधीक्षक अभियंता उत्तम पवार, सहायक आयुक्त मालिनी शिरसाट आणि आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आणि येत्या आठ दिवसांत त्यावर खुलासा करण्याचे आदेश काढले. कालिदासबद्दल असलेल्या तक्रारींबद्दल पत्रकारांशी बोलताना आयुक्त कृष्ण यांनी सांगितले, कालिदास कलामंदिरात गेल्या काही दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू आहे. खुर्च्या बदलण्याचे काम चालू असल्याने काही जुन्या तुटलेल्या खुर्च्या बाजूला ठेवल्या जातात. त्यामुळे त्याची छायाचित्रे टाकून दुरवस्था झाल्याचे भासविले गेले. आचारसंहितेनंतर कालिदासच्या नूतनीकरणाच्या कामाला आणखी गती येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.संकल्पचित्रही हायजॅकदामले यांनी कालिदासच्या दुरवस्थेची छायाचित्रे फेसबुकवर टाकल्यानंतर मनसेने त्यावर प्रतिक्रिया देत दामले यांच्यावरच हल्लाबोल केला. शिवाय, कालिदास कलामंदिरचे संकल्पचित्र तयार असल्याचे सांगत त्याबाबतची छायाचित्रेही सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, आयुक्तांनी वास्तुविशारद धीरज पाटील यांनी तयार केलेल्या संकल्पचित्रांची माहिती पत्रकारांना दिली. त्यावेळी सदर संकल्पचित्रे ही अगोदरच सोशल मीडियावर फिरत असल्याचे आयुक्तांसह पाटील यांच्या निदर्शनास पत्रकारांनी आणून दिल्यानंतर दोहोंना आश्चर्याचा धक्का बसला.