नाशिक : द्वारका परिसरातील टेंबलाई माता मंदिरासमोर शनिवारी (दि़१०) दुपारी रिक्षा लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान रात्रीच्या सुमारास दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकण्यामध्ये झाले होते़ दरम्यान, या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी चौघा संशयितांवर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे़द्वारका परिसरातील टेंबलाई माता मंदिरासमोर कमान लावण्याचे काम सुरू असताना उभ्या केलेल्या रिक्षास काही युवकांनी विरोध केला़ रात्री दहा वाजेच्या सुमारास दगडफेक व काचेच्या बाटल्या फेकल्याची फिर्याद कृष्णा पवार (रा़ संत कबीरनगर) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे़ (प्रतिनिधी)
दगडफेक प्रकरणी चौघांवर गुन्हा
By admin | Updated: October 11, 2015 22:49 IST