शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

चार महिने अगोदरच बिहारला जाणाऱ्या रेल्वे ‘हाउसफुल

By admin | Updated: June 23, 2017 00:12 IST

नाशिकरोड : छट पूजेमुळे १२० दिवस अगोदरच गुरुवारी सकाळी काही मिनिटांतच मुंबईहून बिहारला जाणाऱ्या चारही रेल्वेचे आरक्षण हाउसफुल झाले.

’लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : चार महिन्यांनंतर दिवाळी सणापाठोपाठ येणाऱ्या छट पूजेमुळे १२० दिवस अगोदरच गुरुवारी सकाळी काही मिनिटांतच मुंबईहून बिहारला जाणाऱ्या चारही रेल्वेचे आरक्षण हाउसफुल झाले. रेल्वे प्रशासनाकडून १२० दिवस अगोदर रेल्वे आरक्षण काढण्याची सुविधा देण्यात आली आहे. आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्याच्या सोमवारी दिवाळी सणास प्रारंभ होत असून, १९ आॅक्टोबरला लक्ष्मीपूजन आहे. लक्ष्मी पूजनानंतर सहा दिवसांनी उत्तर भारतीय तीन दिवस छटपूजा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करतात. येत्या २४ ते २७ आॅक्टोबरदरम्यान छटपूजेचा मुहूर्त आहे. विशेष करून मुंबई-ठाणे भागात व नाशिकमध्येदेखील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहेत.रेल्वेचे आरक्षण १२० दिवस अगोदर काढता येत असल्याने गुरुवारी सकाळी ८ वाजता रेल्वे आरक्षण कार्यालय उघडताच २० आॅक्टोबरच्या रेल्वेचे आरक्षण काढता येणार होते. गुरुवारी सकाळी नाशिकरोड रेल्वेस्थानकावर काही मिनिटांतच मुंबईहून बिहारला जाणाऱ्या पवन, भागलपूर, पटना व पाटलीपुत्र एक्स्प्रेस या चारही गाड्यांचे आरक्षण हाउसफुल झाले.