शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

महापौरपदानंतर चौघांना आमदारकीची झूल

By admin | Updated: January 20, 2017 23:41 IST

दोघांना हूल : कॉँग्रेसच्या बच्छाव यांना मंत्रिपदाचा लाभ

नाशिक : महापालिकेत सर्वोच्च असे महापौरपद भूषविल्यानंतर राजकीय महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटतात आणि पुढे विधानसभेत जाण्याचे वेध लागतात. नाशिक महापालिकेतही महापौरपद उपभोगल्यानंतर सहा पैकी चौघांच्या अंगावर आमदारकीची झूल चढली आहे, तर दोहोंना आमदारकीने हूल दिली आहे. यामध्ये कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी तर थेट मंत्रिपदाला गवसणी घातली आहे.  महापालिकेत नगरसेवकापासून सुरू होणारा प्रवास हा प्रत्येक राजकारण्याला महापौरपदापर्यंत घेऊन जाण्यासाठी खुणावत असतो. सर्वोच्च अशा महापौरपदाचा बहुमान मिळाल्यानंतर राजकारणातील पुढची इयत्ता असते ती आमदारकीची. नाशिक महापालिकेत प्रथम व द्वितीय महापौरपद भूषविणारे शांतारामबापू वावरे व पंडितराव खैरे यांनी अगोदर आमदारकीसाठी प्रयत्न केले, नंतर ते महापौर बनले. तर १९९५-९६ या वर्षी अपक्ष असताना महापौरपद भूषविणारे उत्तमराव ढिकले यांनी पुढे आधी शिवसेनेकडून लोकसभा लढवत खासदारकी मिळविली तर सन २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी करताना आमदारकी प्राप्त केली. त्यानंतर १९९७-९८ या वर्षी महापौरपद भूषविणारे त्यावेळी सेनेत असलेल्या वसंत गिते यांनी सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करत विजय संपादन केला.  १९९९-२००२ या काळात पहिल्या महिला महापौरपदाचा मान मिळविलेल्या कॉँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव यांनी सन २००४ च्या विधानसभा निवडणुकीत चुरशीच्या लढतीत विजय प्राप्त केला. त्यानंतर त्यांच्या पदरात आरोग्य खात्याचे राज्यमंत्रिपद पडले होते. सन २००५-०७ या काळात महापौरपद भूषविणाऱ्या भाजपाच्या बाळासाहेब सानप यांनी २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारी करत विजयश्री मिळविली. महापौरपद भूषविलेल्या या चार महापौरांना विधानसभेची पायरी चढण्याचे भाग्य वाट्याला आले.  मात्र, सन २००२-०५ या काळात सेनेकडून महापौरपद भूषविलेल्या दशरथ पाटील यांनी नंतर सेनेकडून लोकसभा निवडणूक लढविली परंतु त्यांचा १४ हजार मतांनी पराभव झाला. पुढे दशरथ पाटील यांनी दोनदा विधानसभा आणि एकदा विधान परिषदेची निवडणूक लढविली परंतु पराभवाने त्यांचा काही पिच्छा सोडला नाही. सन २००७-०९ या काळात महापौरपद भूषविणाऱ्या विनायक पांडे यांनी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी केली परंतु निवडणूक रिंगणात लढण्यापूर्वीच त्यांनी माघार घेतली. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांचे नाव मतपत्रिकेवर कायम राहिले. त्यांनाही आमदारकीने हूल दिली. (प्रतिनिधी)उपमहापौर फरांदे यांची लॉटरीमहापालिकेत उपमहापौरपद भूषविणाऱ्या तिघांनी विधानसभेत जाण्याचे स्वप्न पाहिले. १९९४-९५ या वर्षी उपमहापौरपद भूषविणारे रामदास सदाफुले यांनी चार वेळा नाशिकरोड-देवळाली मतदारसंघातून विधानसभेसाठी उमेदवारी केली. परंतु, त्यांना प्रत्येकवेळी पराभव पत्करावा लागला. त्यामुळे मतदारसंघात त्यांची ओळख ‘सदापडे’ अशीच बनली. २००७-०९ मध्ये भाजपाकडून अजय बोरस्ते यांनी उपमहापौरपद भूषविले, तर भाजपाच्या प्रा. देवयानी फरांदे यांनी २००९-१२ मध्ये उपमहापौरपद भूषविले. सन २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत उपमहापौरपद भूषविलेले हे दोन्ही उमेदवार मध्य विधानसभा निवडणुकीत आमने-सामने लढले. त्यात अजय बोरस्ते यांच्या वाट्याला पराभव आला, तर प्रा. देवयानी फरांदे यांना अटीतटीच्या लढतीत विधानसभेची लॉटरी लागली.