पंचवटीत भरदिवसा चोरट्यांचा प्रतापपंचवटी : शहरात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये खुलेआम सोनसाखळी, दुचाकीचोरी, लूटमारसह धाडसी घरफोड्यांसारख्या गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मंगळवारी (दि.६) पंचवटी व आडगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दोन धाडसी घरफोड्या घडल्याच्या घटना उघडकीस आल्या असून, या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.तीन दिवसांपूर्वीच आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतधाम परिसरातील तीन एटीएमला चोरट्याने लक्ष्य केले होते. सुदैवाने यामध्ये चोरटा अपयशी होऊन जखमी झाल्याने पोलिसांना त्याचा माग काढता आला अन्यथा मोठी रोकड त्याने लंपास केली असती. या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या टोळीने स्वामी नारायणनगरमधील जनार्दनकृपा सोसायटीमधील जस्तारसिंग हुमनसिंग कहालो यांच्या घरी धाडसी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे.
धाडसी घरफोड्यांमधून चार लाखांचा ऐवज लंपास
By admin | Updated: October 6, 2015 23:41 IST