शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

साठेखताद्वारे साडेचार लाखांची फसवणूक

By admin | Updated: June 24, 2017 17:53 IST

मिळकत मालकास साडेचार लाख रुपये देऊन केलेल्या साठेखतानंतर खरेदीखत देणे करून अपेक्षित असताना मूळ मालकाने महापालिकेकडे बांधकाम परवानगी मागून खरेदीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मिळकत मालकास साडेचार लाख रुपये देऊन केलेल्या साठेखतानंतर खरेदीखत देणे करून अपेक्षित असताना मूळ मालकाने महापालिकेकडे बांधकाम परवानगी मागून खरेदीदारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़ रवींद्रकुमार गौरीशंकर (४४, भावगंगा सोसायटी, आनंदनगर, कामटवाडे, नाशिक) यांनी गंगापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित अरविंद अंबादास कुलाल, अजय अरविंद कुलाल व राजेंद्र शांतीलाल कलखबर (रा़ रुक्मिणी अपार्टमेंट, गंगापूररोड) यांच्याकडून २००२ मध्ये मिळकत खरेदी केली़ या खरेदीपोटी गौरीशंकर यांनी संशयितांकडून साठेखत करून घेऊन २० आॅगस्ट २००२ ते २० जून २०१७ या कालावधीत ४ लाख ४१ हजार रुपये धनादेश तसेच रोख स्वरूपात दिले़ मात्र संशयितांनी या मिळकतीची खरेदी न देता महापालिकेकडून बांधकाम करण्याची परवानगी मिळवली़ तसेच खरेदीखत करून न देता त्यासाठी अधिक पैशांची मागणी करून फसवणूक केल्याचे गौरीशंकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे़ याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात बाप-लेकांसह तिघा संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़