शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

चार घरे कोसळली...

By admin | Updated: August 1, 2014 01:09 IST

काझीची गढी खचली : जीवितहानी टळली; रहिवासी स्थलांतरास राजी

नाशिक : शहरात सुरू असलेल्या पावसामुळे काझीच्या गढीचा काही भाग आणखी खचला. त्यामुळे त्यावरील चार घरे कोसळली. सुदैवाने ती रिकामी असल्याने जीवित वा वित्तहानी झाली नाही. भीमाशंकर येथे डोंगर खचल्यामुळे गाव नष्ट झाल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सतर्क झाली असून, गढीवरील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी हालचाली करण्यात आल्या. शुक्रवारपासून (दि. १) रहिवासी गाडगे महाराज धर्मशाळेत स्थलांतरित होणार आहेत.गेल्या सोमवारपासून शहरात पाऊस सुरू असून, दोन दिवसांपासून गढी खचत आहे. त्यामुळे पालिकेकडून या रहिवाशांना स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. काल संबंधित रहिवाशांना स्थलांतरित होण्यास सांगूनही ते राजी होत नव्हते. महापालिकेने पावसाळ्याापूर्वीदेखील रहिवाशांना नोटिसा बजावल्या होत्या; परंतु त्याचा उपयोग होत नव्हता. दरम्यान, काल भीमाशंकर येथे डोंगरच गावावर कोसळल्याने पालिका प्रशासन सतर्क झाले. आज सकाळी गढीवरील चार बंद घरे कोसळल्यानंतर यंत्रणेने धावपळ केली. अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिकेच्या यंत्रणेने रहिवाशांना स्थलांतरित होण्यास सांगितले; परंतु ते तयार होत नव्हते. पोलिसांनी त्यांची नावे आणि भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून घेतले. त्यानंतर सायंकाळी पोलीस उपआयुक्त विजय बारगळ, पोलीस निरीक्षक कड, महापालिकेचे अग्निशमन दल अधिकारी अनिल महाजन, नगरसेवक विनायक खैरे, रंजना पवार, पूर्व प्रभागाच्या विभागीय अधिकारी शिरसाठ यांच्यासह रहिवासी उपस्थित होते. रहिवाशांनी गाडगे महाराज धर्मशाळेच्या खोल्यांमध्ये स्थलांतरित व्हावे, धर्मशाळेचे भाडे महापालिका भरेल या अटीवर रहिवासी तूर्तास तयार झाले आहेत. शुक्रवारी सकाळपासून सर्व रहिवासी स्थलांतरित होणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याठिकाणी जुन्या भग्नावस्थेत असलेल्या मशिदीचा ढाचा धोकादायक असल्याने तो उतरवून घेण्यास विश्वस्तांना सांगण्यात आले आहे; परंतु विश्वस्त ऐकण्यास तयार नसल्याने अद्याप त्यावर निर्णय होऊ शकला नसल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)