शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावच्या अल्पवयीन चार मुली पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 19, 2017 04:42 IST

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार ते पाच वयोगटातील चार मुली १८ जून रोजी अकोटात आढळून आल्या.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथून बेपत्ता झालेल्या चार ते पाच वयोगटातील चार मुली १८ जून रोजी अकोटात आढळून आल्या. शहर पोलिसांनी राबविलेल्या शोधमोहिमेमध्ये या चारही मुली ताब्यात घेण्यात आल्या आहेत. सदर अल्पवयीन मुली या अकोटात आल्या कशा, या महिलेच्या घरी त्या राहिल्या कशा, याबाबत पोलिसांनी तपास करणे गरजेचे झाले. अकोट शहर पोलिसांनी शहरातील काही भागात शोधमोहीम राबविली. यावेळी अमिनपुरा या ठिकाणी बाहेरगावावरील चार ते पाच अल्पवयीन मुली असल्याची माहिती मिळाली. त्यावरून रशिदाबी यांच्या घरी पोलिसांनी चौकशी केली असता यावेळी जयनाबी तहरीन आसीफ (१२), कुलसुम तहरीन आसीफ (९), मयीम तहरीन आसीफ (५) व मिसबा अजीम खान (८) या आढळून आल्या. त्यांची अधिक चौकशी केली असता त्या मालेगाव येथून आल्या असल्याचे समजले. मालेगाव येथून काही मुलीसुद्धा बेपत्ता झाल्या असल्याची माहिती अकोट पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे शहानिशा करण्याकरिता अकोट शहर पोलिसांनी मालेगाव पोलिसांशी संपर्क साधला त्या बेपत्ता असल्याची नोंद असल्याचे समोर आले. मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, पोलीस निरीक्षक सी.टी. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद माळी, जितेंद्र कातखेडे, अमरदीप गुरू, वीरेंद्र लाड, दीपाली देशमुख यांनी केली. याबाबत मालेगाव पोलिसांचे पथक मुलींना ताब्यात घेण्याकरिता येत असल्याचे ठाणोदार सी.टी. इंगळे यांनी सांगितले.