नाशिक : महापालिकेच्या नाशिक पूर्व, सिडको, नाशिकरोड आणि पंचवटी या चार प्रभाग समित्यांच्या सभापतिपदांसाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने चारही ठिकाणी सभापतिपदाची निवड बिनविरोध झाली आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची केवळ औपचारिकता शिल्लक आहे. मात्र, पश्चिम आणि सातपूर विभागात सरळ सामना होणार असला तरी काट्याची लढत बघायला मिळणार आहे. याठिकाणी मनसेची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
चार प्रभाग सभापती बिनविरोध
By admin | Updated: May 17, 2017 18:29 IST