शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात आजपासून चार दिवस संचारबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 01:15 IST

सटाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरात तीन दिवसात ३८, तर तालुक्यात ६२ रुग्णांची वाढ झाली. सटाणा न्यायालयात तीन, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून (दि. २५) शुक्रवारपर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देकोरोना : प्रशासनाचे सहकार्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कसटाणा : कोरोनाबाधितांच्या संख्येत शहरात तीन दिवसात ३८, तर तालुक्यात ६२ रुग्णांची वाढ झाली. सटाणा न्यायालयात तीन, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन रुग्ण आढळून आल्याने मंगळवारपासून (दि. २५) शुक्रवारपर्यंत चार दिवसांचा जनता कर्फ्यू सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी व नगरपालिका प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आला आहे.सटाणा शहर व परिसरात तीन दिवसांत ३८हून अधिक तर आज जवळपास तब्बल १३ रुग्ण बाधित आढळून आले आहेत, तर चार जणांचा बळी गेल्याने शहरवासीयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील बाधितांच्या संपर्कात आलेल्यांची साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यू घोषित करण्याची मागणी मनसेचे पंकज सोनवणे व मंगेश भामरे यांनी नगर परिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती.या पार्श्वभूमीवर शनिवारी येथील देवमामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात सामाजिक अंतर ठेवून शहरातील व्यापारी, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, नगरसेवक, सर्वपक्षीय पदाधिकारी व पत्रकार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत मंगळवार ते शुक्रवार चार दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचे घोषित करण्यात आले.

या जनता कर्फ्यूदरम्यान मेडिकल सेवावगळता सर्व व्यवसायांसह अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार असून, रस्त्यांवर पूर्ण शुकशुकाट असावा यासाठी जनतेनेदेखील घराबाहेर पडू नये, असा एकमुखी निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.या बैठकीसाठी नगराध्यक्ष सुनील मोरे, व्यापारी महासंघ अध्यक्ष राजेंद्र राका, नगरसेवक महेश देवरे, राहुल पाटील, राकेश खैरनार, बाजार समिती व्यापारी रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, शरद ततार, राजकुमार सोनी, अनिल बागुल, मनसेचे पंकज सोनवणे, मंगेश भामरे, अरविंद सोनवणे, बिंदूशेठ शर्मा, किशोर कदम, बापू अमृतकर, पत्रकार विश्वास चंद्रात्रे, कैलास येवला, अंबादास देवरे आदींसह शहरातील विविध व्यावसायिक, पक्षीय पदाधिकारी उपस्थित होते.

तीन दिवसात ४२ बाधित

शहरासह तालुक्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. सटाणा शहर हॉटस्पॉट बनले असून, शनिवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालात शहरातील १३, तरतालुक्यातील २९ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बागलाणची रुग्णसंख्या तीनशेचा टप्पा गाठण्याची शक्यता बळावली आहे.सटाणा शहर दिवसागणिक कोरोना हॉटस्पॉट होऊ लागले असून, दि. १९ रोजी ७, दि . २० रोजी ११ , दि . २१ रोजी ७, दि. २२ रोजी १३ बाधित आढळून आले आहेत. चार दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे.शनिवारी प्राप्त अहवालात ३४ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये सटाणा शहर १३, नामपूर १२, अंतापूर ४, जायखेडा १ तर ताहाराबाद येथील चार जणांचा समावेश आहे.सटाणा शहर न्यायालयातील तीन जणांचा तर सटाणा बाजार समितीमधील दोन कर्मचारी बाधित आढळून आल्याने या ठिकाणी अधिक दक्षता घेतली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcultureसांस्कृतिक